पुणे

पालिकेची दीड एकर जागा पार्किंगसाठी मिळणार लोगो ः मांजरी उपबाजार समिती - स्थायी समितीपुढे प्रस्ताव

CD

पुणे, ता. २५ ः पुणे-सोलापूर महामार्गालगत मांजरी येथील उपबाजार परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेतर्फे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला अ‍ॅमिनिटी स्पेसची सुमारे दीड एकर जागा १० वर्षासाठी भाड्याने दिली जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मोबदल्यात बाजार समितीतर्फे महापालिकेला पहिल्या वर्षी ९ लाख ८१ हजार ५३ रुपये भाडे मिळणार असून, दरवर्षी त्यात पाच टक्के वाढ केली जाणार आहे.
मांजरी उपबाजार हा शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित असून, हवेली पूर्व, दौंड, शिरूर, बारामती, पुरंदर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल येथे येतो. रोज या परिसरात सुमारे १५०० वाहने येतात. पण तेथील पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने अनेक वाहनचालक पुणे- सोलापूर महामार्गाच्या बाजूला गाड्या उभ्या करतात. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बाजार समितीने ऑक्टोबर २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे महापालिकेची अ‍ॅमिनिटी स्पेसची जागा पार्किंगसाठी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पवार यांनी महापालिकेला जागा देण्याचे निर्देश दिले होते. ही जागा केवळ शेतकरी, खरेदीदार आणि इतर संबंधित घटकांच्या वाहनतळासाठी वापरण्याची अट घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

सावली, तारा की ऐश्वर्या कोण मारणार बाजी? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये रंगणार 'आम्ही सारे खवय्ये'ची मेजवाणी

Nashik Crime : 'जीएसटी' बनावट सॉफ्टवेअर प्रकरण; देवळालीतील इंजिनिअर ताब्यात, गुप्तचारांची झडती सुरू

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

Nagpanchami Special Recipe: नागपंचमीला घरच्या घरी बनवा पौष्टिक ज्वारीच्या लाह्या, लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT