पुणे

घरफोड्या करणारी टोळी गजाआड

CD

पुणे, ता. २५ : लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीतील तिघांना अटक केली. सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे आरोपी यापूर्वीही अनेक घरफोड्यांच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.
आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी (वय २१, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी), विशाल मारुती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) आणि ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आर्यन माने आणि ओमकार गोसावी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात हडपसर, वानवडी आणि लोणीकंद पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्ट स्ट्रीटजवळील एका बॅंकेत १५ जुलै २०२५ रोजी एकजण कपाट उघडून कागदपत्रांची नासधूस करत होता. तिजोरी उचलून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकातील पोलिस अंमलदार लोकेश कदम आणि सागर हराळ यांनी लष्कर ते फुरसुंगी दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींनी वापरलेले वाहन ओळखण्यात आले. त्यानंतर रामटेकडी, हडपसर व फुरसुंगी परिसरात सापळा रचून तिघा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी लष्कर परिसरासह कोंढव्यातही घरफोडी केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

MPSC Update : एमपीएससीची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया सुरू; उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक, विद्यार्थ्यांकडून स्वागत

Health Tests For Men: पन्नाशीनंतर निरोगी राहण्यासाठी पुरुषांनी कराव्यात 'या' ५ महत्त्वाच्या चाचण्या

Temple Land : ‘देवस्थानच्या जमिनींचे संरक्षण विश्वस्तांनी करावे’ : शेखर गायकवाड

SCROLL FOR NEXT