पुणे

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण

CD

निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात १६ व १७ ऑगस्ट रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

-----------------------------------------------------------
फक्त पुणे व पिंपरी-चिंचवड आवृत्त्यांसाठी एपीजी लर्निंग व टेक महिंद्रा फाउंडेशनच्या लोगोसह वापरावी

जीएसटी अकाउंट असिस्टंट व ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन विनामूल्य प्रशिक्षण
डॉ. नानासाहेब परुळेकर (सकाळ) चॅरिटेबल ट्रस्ट आणि टेक महिंद्रा फाउंडेशन यांच्यावतीने १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठीचे विनामूल्य प्रशिक्षण वर्ग एक ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन’ हे कोर्सेस घेतले जातात. याबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी नोकरीच्या ठिकाणी गरजेची असणारी महत्त्वाची कौशल्येदेखील विनामूल्य शिकविली जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर साहाय्य पुरवले जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० जुलैपर्यंत पुढे दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा दिलेल्या पत्यावर भेट द्यावी.
संपर्क : ९३२५८७४१३७/ ८६६८७६२२४० / ८७६७६९६२८८
ठिकाण : चाळ नंबर ८८/४, डांबर कोठी, नगरसेवक गौडा यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

SCROLL FOR NEXT