पुणे

कावीळ दिनानिमित्‍त जनजागृती फेरी औषध वैद्यकशास्‍त्र विभागाचे आयोजन

CD

पुणे, ता. २८ : कावीळ जनजागृती सप्ताहानिमित्त बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय यांच्यावतीने पुण्यात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. सोमवारी सकाळी ही फेरी काढण्यात आली. यामध्ये विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि नर्सिंग कॉलेजचे शिक्षक-विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी संदेश, फलक आणि घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये कावीळविषयी जनजागृती केली. कावीळ या यकृतास बाधणाऱ्या आजाराविषयी नागरिकांमध्ये अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार होत नाहीत, यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, सामान्‍य शस्त्रक्रिया विभागाच्‍या प्रमुख डॉ. लता भोईर, इतर विभागाचे प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. संगीता दाभाडे, डॉ. संजीवनी आंबेकर यांनी भाग घेतला. या फेरीचे आयोजन औषध वैद्यकशास्‍त्र विभागप्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, प्राध्‍यापक डॉ. अनिता बसवराज यांनी केले. तसेच या विभागातील सहयोगी प्राध्‍यापक डॉ. हर्षल भिटकर, डॉ. संजय मुंढे, डॉ. नागनाथ रेडेवाड, डॉ. धनंजय ओगले, डॉ. नेहा सूर्यवंशी, डॉ. मीनल चंदनवाले, डॉ. आशना सचदेवा यांनी भाग घेतला.

फोटो ः 35235

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi : ''माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू तेव्हा आले, जेव्हा...''; अमित शाहांच्या आरोपांना प्रियांका गांधींनी दिलं प्रत्युत्तर...

Jitendra Awhad: मी अतिविश्वास ठेवला, ही माझ्या आयुष्यामधील मोठी चूक; शिंदेंसेनेच्या युवा नेत्यावर आव्हाडांची स्तुतीसुमने

Nandani Elephant: महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोडप्रकरणी शंभर जणांवर गुन्हे दाखल, १२ पोलिस अधिकारी जखमी

Latest Maharashtra News Updates: लोकसभेत राहुल गांधी यांच्या भाषणाला सुरुवात

Rajnath Singh Rajya Sabha Speech: '..तर आम्ही पाकिस्तानला मदत करण्यास तयार आहोत', राजनाथ यांचं राज्यसभेत मोठं विधान!

SCROLL FOR NEXT