पुणे

शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांचे आज सामूहिक रजा आंदोलन

CD

पुणे, ता. ३१ : मागील तीन-चार महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या नागपूर विभागातील बोगस शालार्थ प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही चौकशी न करता अपमानास्पदरीत्या अटक करण्यात आली आहे. याचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाशी संलग्न असणाऱ्या अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने निषेध केला आहे. तसेच, संघातर्फे राज्यभर शुक्रवारी (ता. १) एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. संघाच्या मागण्यांवर राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यास येत्या आठ ऑगस्ट रोजी बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघाचे अध्यक्ष शेषराव बडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा केलेल्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी संघाची मागणी आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विभागाच्या परवानगीशिवाय विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी राज्य सरकारकडून मिळत नाही, तोपर्यंत राज्यातील शिक्षण सेवेतील सर्व अधिकारी शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन करतील, असे बडे यांनी राज्य सरकारला दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : महिला अत्याचारप्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी; आज सुनावली जाणार शिक्षा

Fake Shalarth ID Scam: न्यायालयाचे आदेश असूनही अटकेची कारवाई; शिक्षण सचिवांची पोलिस अधिकाऱ्यांना नाराजीची फोनवार्ता

Pune Municipal Corporation : प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात,आयुक्तांकडून आढावा; राज्य सरकारकडे सोमवारी होणार सादर

Monsoon Update: वरुणराजा मेहरबान, पाऊस सरासरीपार; विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये समाधानकारक वृष्टी

Manoj Jarange: आरोपींना तत्काळ अटक करा; जरांगे, महादेव मुंडे खून प्रकरण कारवाई न केल्यास बीड ‘बंद’चा इशारा

SCROLL FOR NEXT