पुणे

जड वाहनांना वेळा व मार्ग मर्यादित रेड झोनमध्ये शनिवारी, रविवारी वाहतुकीस तात्पुरती परवानगी

CD

पुणे, ता. १ : शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांच्या प्रवेशासाठी नवीन तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश शनिवार, रविवार आणि १५ ऑगस्ट या दिवसांपुरता मर्यादित असणार आहे.
शहरात काही भागात बांधकामे सुरू आहेत. बांधकाम क्षेत्राशी आवश्यक असलेल्या डंपर, हायवा, मिक्सर (आरएमसी) यांसारख्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना शनिवारी (२ ऑगस्ट, ९ ऑगस्ट, १६ आणि २३ ऑगस्ट) आणि शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंतचा कालावधी वगळून रेड झोनसह शहरात वाहतुकीस परवानगी राहील. मात्र, जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर यांना बंदी राहील.
तसेच, रविवारी (३ ऑगस्ट, १० ऑगस्ट, १७ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट) या दिवशी पूर्ण दिवसभर रेड झोनसह सर्वत्र वाहतुकीस परवानगी राहील, अशी माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

शहराच्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या ठिकाणी (रेड झोनमध्ये) जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी आहे.
रेड झोनमधील या प्रमुख मार्गावर प्रवेश बंद :

१. नगर रस्ता क्षेत्र :
- विमाननगर चौकातून दत्तमंदिर चौक
- शास्त्रीनगर चौकातून कल्याणीनगरकडे
- पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्क जंक्शन
- वडगावशेरीतून बिशप स्कूल कल्याणीनगर
- पेट्रोलसाठा चौकातून विमानतळाकडे
- लोहगावपासून पेट्रोलसाठा चौकापर्यंत.
-
२. जुना मुंबई-पुणे हायवे :
- पाटील इस्टेटच्या पुढे इंजिनिअरिंग कॉलेज चौक.

३. गणेश खिंड रस्ता :
- ब्रेमेन चौक ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक.
- ब्रेमेन चौक ते औंध परिहार चौक
- औंध- वाकड रस्त्यावरून महादजी शिंदे पूल मार्ग.

४. बाणेर रस्ता :
- राधा चौकाच्या पुढे बाणेरपर्यंत (बाणेर ते विद्यापीठसमोरील चौक)

५. पाषाण सूस रस्ता :
- पाषाण ते अभिमान श्री चौक

६. पौड रस्ता :
- पौड रस्त्यावरून पौड जंक्शनच्या पुढे नळस्टॉपकडे
- पौड रस्त्यावरून एसएनडीटी, लॉ कॉलेज रस्ता.

७. कर्वे रस्ता, डीपी रस्ता :
- कर्वे पुतळ्याच्या पुढे पौड फाट्याकडे प्रवेश बंद

८. सिंहगड रस्ता :
- राजाराम पूल ते स्वारगेट
- राजाराम पूल ते कर्वेनगर, डीपी रस्ता.

९. सातारा रस्ता :
- मार्केट यार्ड जंक्शन ते स्वारगेट
- दांडेकर पूल ते सेनादत्त पोलिस चौकीच्या पुढे
- मित्रमंडळ चौक ते सारसबाग

१०. सोलापूर रस्ता :
- सेव्हन लव्हज चौक ते टिंबर मार्केट
- सेव्हन लव्हज चौक ते स्वारगेट
- गोळीबार मैदान जंक्शन ते लष्कर
- मम्मादेवी जंक्शन ते लष्कर
- भैरोबानाला चौक ते एम्प्रेस गार्डन आणि रेसकोर्स


- रामटेकडी चौकातून बी. टी. कवडे रस्ता
- मगरपट्टा ते ताडीगुत्ता चौक, पारपत्र कार्यालय
- मुंढवा चौक ते ताडीगुत्ता चौक.

११. कोंढवा :
- एनआयबीएम रस्ता ते ज्योती हॉटेल चौक आणि पुढे वानवडी
- लुल्लानगर चौकातून वानवडी.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

MLA Rohit Pawar : औद्योगिक कंपन्यांच्या क्षेत्रात दादागिरी नेमकी कोणाची?

IND vs ENG 5th Test: भारताने रचला विजयाचा पाया; यशस्वी जैस्वालच्या शतकाने इंग्लंडची भंबेरी, उभं केलं गाठता न येणारं लक्ष्य

Local Viral Video: लोकल तिकीट तपासणी मोहिमेला हिंसक वळण; प्रवाशाचा रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला; व्हिडीओ व्हायरल

Uddhav Thackeray : निष्ठावान विकले जाऊ शकत नाहीत; उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले लक्ष्य

SCROLL FOR NEXT