पुणे

खड्डे दुरुस्तीसह पीएमपी, मेट्रो सेवा रात्रभर सुरू ठेवा गणेशोत्सवासंबंधी सोई-सुविधांचे प्रश्‍न महापालिका, महावितरण व पोलिस प्रशासनाने तातडीने सोडवावेत

CD

पुणे, ता. ३ : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे दुरुस्तीची गरज आहे. महापालिकेने तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्याची गरज आहे. उपनगरे व ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी गणेशोत्सवाच्या काळात पीएमपी तसेच मेट्रो सेवा रात्रभर सुरू ठेवावी. भिडे पुलावरील काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, उत्सवापूर्वी हे काम पूर्ण न केल्यास भाविकांची गैरसोय होईल, त्यामुळे संबंधित पुलावरील काम त्वरित पूर्ण करावे, अशी अपेक्षा गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत केली.

पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी रस्ते बंद करण्याची भूमिका घेऊ नये, याउलट पूर्व भागातील देखावे भाविकांना पाहता येतील, अशी व्यवस्था करावी. विसर्जन मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या, झाडांवर लटकणाऱ्या बेकायदा केबल काढून टाकाव्यात, स्वच्छतागृहे, साफसफाईची चांगली व्यवस्था असावी. पोलिसांनी वाहतुकीचे व गर्दीचे चांगले व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा, महापालिका, महावितरण कंपनी व पोलिस प्रशासनाने या उपाययोजना करण्यावर भर दिल्यास गणेशोत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पार पडेल, अशा विविध प्रकारच्या सूचना गणेशोत्सव मंडळांनी बैठकीत केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Kuno Cheetah: भारतात चित्त्यांचे 'अर्धशतक' पूर्ण! ज्वालाने दिला ५ पिल्लांना जन्म; कूनोमध्ये आता चित्त्यांची संख्या ५३ वर!

Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात

SCROLL FOR NEXT