पुणे

मुलांसह मोठ्यांनाही आजारपणाचा फटका

CD

पुणे, ता. ४ : दरदरून ताप भरतोय व तापाच्या गोळ्या घेऊनही काही वेळा उतरत नाही. तापाबरोबरच कोरडा किंवा कफयुक्‍त खोकला, थकवा, डोकेदुखीदेखील होत असून खोकलाही १५-१५ दिवस राहतो. गेल्‍या पंधरा दिवसांपासून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही लक्षणे दिसून येत आहेत व या आजारपणातून बाहेर पडण्‍यासाठी एक ते दोन आठवडे लागतात. अशा प्रकारच्‍या विषाणूजन्‍य आजारांनी (व्‍हायरल) सध्‍या अनेकांना घेरलेले आहे.
डॉक्‍टरांच्या मते याचे मुख्‍य कारण हे हवामानातील तात्‍पुरता झालेला बदल हे आहे. यामध्‍ये काही वेळात ऊन पडते तर काही वेळात लगेच पाऊस येतो. त्‍याचबरोबर आठवडे न आठवडे ऊनच पडत नाही. असे वातावरण हे विषाणूंच्‍या वाढीसाठी पोषक असल्‍याने सध्‍या वेगवेगळ्या ‘फ्लू’च्‍या विषाणूंचे प्रमाण (व्‍हायरल लोड) वाढले आहे. यामध्‍ये इन्फ्लूएंझा ए, बी, सी यासह स्‍वाईन फ्लू , फुफ्फुसे आणि श्वसननलिकांमध्ये संसर्ग करणारा ‘आरएसव्‍ही’ (रेस्‍पीरेटरी सिंशिटियल व्‍हायरस) त्‍याची बाधा होत असल्‍याने आजारी पडण्‍याचे प्रमाण वाढले आहे. त्‍याचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसला असल्‍याने सध्‍या बालरोगतज्‍ज्ञांकडे मुलांची संख्‍या वाढली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बालरोगतज्‍ज्ञ डॉ. नीलेश गुजर म्‍हणाले, ‘‘सूर्यप्रकाश कमी असल्याने मुलांमध्‍ये विषाणूजन्य आजार वाढले आहेत. पावसात भिजल्‍यानंतरही मुले आजारी पडतात. त्‍यामध्‍ये श्‍वसनयंत्रणेच्‍या वरच्‍या म्‍हणजेच घसा किंवा खालच्‍या भागाचा जसे श्‍वासनलिका, फुफ्फुस यांचा संसर्ग होतो. घरात एखादे मुल आजारी पडले की त्‍याचा संसर्ग दुसऱ्याला होतो पण त्‍याचे दुसऱ्याला लक्षणे दिसून यायला सहा ते सात दिवस जातात. औषधे घेऊनही ताप जात नाही कारण विषाणूजन्‍य आजारांच्‍या पाठोपाठ जीवाणूजन्‍य आजारांचाही संसर्ग होतो आहे. खासकरून ज्‍यांची प्रतिकारशक्‍ती कमी आहे त्‍यांच्‍यामध्‍ये याचा प्रादुर्भाव दिसून येतो. मुलांमध्‍ये प्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी प्रोटीनयुक्‍त घटकाच्‍या आहाराचा समावेश करणे गरजेचा असून सोबत व्‍यायाम करायला हवा. आहारात उकडलेली अंडी, इडली, मोड आलेले धान्य, पनीर याचे प्रमाण वाढवायला हवे.
मुलांबरोबरच मोठ्यांमध्‍येही आजारी पडण्‍याचे प्रमाण वाढलेले आहे व गेल्‍या तीन दिवसांत ते जास्‍त वाढले आहे. याबाबत पुणे जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्‍या गत कालावधीच्‍या अध्‍यक्षा डॉ. शुभदा जोशी म्‍हणाल्‍या, ‘‘जुलैच्‍या मध्‍यापासून रुग्णांची संख्‍या ३० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. ८० ते ९० टक्‍के रुग्‍णांना विषाणूजन्‍य आजारांची लक्षणे आहेत. पूर्वी तापाची औषधे व प्रतिजैविके दिली तरी रूग्‍ण बरे व्‍हायचे मात्र, आता लवकर बरे होत नाहीत व पुन्‍हा पुन्‍हा औषधे द्यावी लागतात. सारखा पाऊस असल्‍यास सर्दी, खोकला येतो व किंवा पोटाचे विकार दिसायचे व औषधांनी ते लगेच बरेही होतात. मात्र आता लवकर बरे होत नाहीत. हा वातावरण बदलाचा परिणाम आहे. मात्र, रुग्‍णांना भरती करण्‍याची गरज पडत नाही.’’

काय काळजी घ्याल?
- घरगुती अन्‍न खा, बाहेरचे अन्‍न टाळा, व्‍यायाम करा
- आजारी पडल्‍यास सुरवातीलाच डॉक्‍टरांना दाखवा
- उशिरा दाखवल्‍याने तापाची तीव्रता वाढतो व बरे होण्‍यास उशीर लागतो
- पावसात मुलांनी किंवा मोठ्यांनी भिजू नये
- प्रोटीनयुक्‍त आहार जास्‍त प्रमाणात घ्या
- डॉक्‍टरांनी दिलेले औषधे नियमितपणे घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

Mumbai News: कबुतरखाना कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'

Latest Marathi News Updates Live : अंजली दमानिया विरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT