पुणे, ता. ११ ः ‘‘महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांचा उद्धार करण्यासाठी कार्य केले. पण त्यांना छळणारे, चिखलफेक करणारे इंग्रज नव्हते, तर भारतीयच होते. फुले चित्रपटातून हेच दाखविण्याचा प्रयत्न केला जात असताना केंद्र व राज्य सरकार सेंसर बोर्डाच्या माध्यमातून या चित्रपटातील दृश्यांना कात्री लावत आहे,’’ असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते. या वेळी सपकाळ म्हणाले, ‘‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय आहे, त्यामुळे सरकारने येथील संचालक मंडळ बरखास्त करून ते ताब्यात घ्यावे. चीनच्या युद्धाच्या वेळेस लता मंगेशकर यांच्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातूनही पाणी आले होते. त्यानंतर सर्वांनीच मंगेशकर कुटुंबीयांवर खूप प्रेम केले. लता मंगेशकर यांच्या विरोधामुळे मुंबईतील उड्डाण पूल रद्द झाला. पण आता याच मंगेशकरांचा संबंध असलेल्या रुग्णालयाकडून मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.’’
फुलेंच्या इतिहासाबद्दल खोडसाळपणा नको
थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वांत आधी मुलींची शाळा राजवाड्यात सुरू केली, असा दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. त्यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘‘मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली, याला जग साक्षी आहे. खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड करू नये. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांचा इतिहास चित्रपटात दाखवू नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या चुकीच्या लोकांची उदयनराजे, शिवेंद्रराजे भोसले पाठराखण करत आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.