पुणे, ता. ११ : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘जागर संविधानाचा’ हा संयुक्त कार्यक्रम विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. १३ ते १९ एप्रिल दरम्यान हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी समितीचे सचिव दीपक म्हस्के, तानाजी तापकीर उपस्थित होते. वाडेकर म्हणाले, ‘‘बोपोडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (ता. १३) रात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा होणार आहे. त्यानंतर आठवडाभर ‘जयंती जल्लोष’, भारुड व आंबेडकरी जलसा, ‘वुई द पीपल’ हे संगीत महानाट्य, ‘थेट तुमच्या घरातून’ नाट्यप्रयोग, ‘गौरव संविधानाचा’ आदी कार्यक्रम होणार आहेत.’’
‘फुले’ चित्रपटाला पाठिंबा
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने तब्बल १२ बदल सुचवले आहेत. समाजसुधारकांचे कार्य लोकांपुढे येऊ नये, असे सेन्सॉर बोर्डाला वाटते. परंतु आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष ‘फुले’ चित्रपटाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे परशुराम वाडेकर यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.