पुणे

तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर अन् दक्षिण दिग्विजय

CD

पुणे, ता. १५ ः शिवचरित्र म्हटल्यावर चटकन डोळ्यांसमोर येतात ते प्रसंग म्हणजे अफजलखान वध, पन्हाळा ते पावनखिंड, पुरंदरचा तह अन् आग्य्राहून सुटका. पण छत्रपती शिवाजी महाराज आग्‍य्राहून परत आल्यानंतरच्या काळातील पुढची १५ ते २० वर्षे महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अफाट पराक्रम गाजवला. शिवचरित्रातील ही गोष्टीमागची गोष्ट आता ‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उलगडणार आहे.
सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांवरील प्रयोग ५ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत प्रत्येक शनिवार-रविवारी सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होत आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रांका ज्वेलर्स असून सहप्रायोजक ‘रावेतकर ग्रुप’ हे आहेत. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे ‘फायनान्स पार्टनर’ असून ‘द नेचर - मुकाईवाडी’, व्हीटीपी रिॲलिटी आणि ‘शिवसृष्टी थीम पार्क’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
या कार्यक्रमातील पहिल्या दोन शनिवार-रविवारी ‘अफजलखानाचा वध’, ‘पन्हाळा ते पावनखिंड’, ‘पुरंदरचा तह’ आणि ‘आग्य्राहून सुटका’ हे चार भाग सादर झाले. आता शनिवारी (ता. १९) ‘मोहीम मांडली मोठी’ हा भाग सादर होणार आहे. १६७० पासून पुढील चार वर्षांत तानाजीराव मालुसरे, प्रतापराव गुजर यांसारख्या अनेकांनी स्वराज्याच्या अग्निकुंडात प्राणार्पण केले आणि त्यातूनच रायगडावर स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले. या चार वर्षांतील मराठ्यांच्या अफाट कर्तृत्वाचा, असीम शौर्याचा आणि अचाट पराक्रमांचा जागर या भागात होणार आहे.
रविवारी (ता. २०) ‘शिवराज्याभिषेक’ हा भाग सादर होणार आहे. सह्याद्री, महाराष्ट्र आणि मराठे यांच्यासाठी एका अपूर्व अस्मितेचा प्रसंग असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची कथा यात उलगडेल. त्यापुढील शनिवारी (ता. २६) ‘दक्षिण दिग्विजय’ या भागात राज्याभिषेकानंतरच्या चार वर्षांची घौडदौड समोर येईल. तर रविवारी (ता. २७) ‘लढाई मराठी अस्तित्वाची’ या समारोपाच्या भागात मराठ्यांच्या अस्मितेचा लढा आणि औरंगजेबाला पुरून उरलेला पराक्रम उलगडेल.

वेळापत्रक
शनिवार, ता. १९ एप्रिल - सकाळी ९.३० वाजता - ‘मोहीम मांडली मोठी’
रविवार, ता. २० एप्रिल- सकाळी ९.३० वाजता - ‘शिवराज्याभिषेक’
शनिवार, ता. २६ एप्रिल - सकाळी ९.३० वाजता - ‘दक्षिण दिग्विजय’
रविवार, ता. २७ एप्रिल - सकाळी ९.३० वाजता - ‘लढाई मराठी अस्तित्वाची’

तिकिटांविषयी
‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ हा उपक्रम सशुल्क असून यासाठी सीझन पास आणि प्रत्येक प्रयोगासाठीचे वैयक्तिक तिकीट उपलब्ध आहे.
कार्यक्रमाची तिकीट विक्री ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या संकेतस्थळांवर सुरू असून बालगंधर्व रंगमंदिरात देखील तिकिटे उपलब्ध आहेत. बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून देखील तिकीट आरक्षित करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

आजपासून बदलणार 'या' राशींचं नशीब फळफळणार ! नव्या वर्षापर्यंत पैशांची बरसात आणि कामात यश

Pune Crime : मुलीशी बोलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; कोथरूडमधील सहा आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT