पुणे, ता. ४ ः ई-बाईक टॅक्सीच्या व्यवसायाला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विविध रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे. पुणे जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीतर्फे ही परवानगी रद्द करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. ९) प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
कृती समितीचे अशोक साळेकर, प्रदीप भालेराव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी आनंद अंकुश, अर्शद अन्सारी, अंकुश नवले आदी उपस्थित होते. या आंदोलनात सावकाश रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, शिवनेरी रिक्षा संघटना, जनता गॅरेज वाहतूक संघटना, शिवा वाहतूक सेवा संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वाहतूक विभाग आदी संघटना सहभागी होणार आहेत. ‘‘शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असताना दररोज नवनवीन रिक्षा परवाने दिले जात आहेत. २०१७ पासून पन्नास हजार नवीन रिक्षा सुरू झाल्या असून, ओला-उबेरमुळे तीस हजार नवीन चारचाकी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांवर अन्याय झाला असून, ई-बाईक टॅक्सीच्या निर्णयाने अनेक रिक्षाचालकांवर परिणाम होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द झालाच पाहिजे’’, अशी भूमिका कृती समितीच्या सदस्यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.