पुणे

गुंड पठाणविरुद्ध गुन्हा दाखल

CD

पुणे, ता. ४ : हडपसरमधील सय्यदनगर परिसरातील एका महिलेच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळविण्याचा प्रयत्न आणि २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दहशत माजविणाऱ्या गुंडांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तक्रारदार महिलेची सय्यदनगरमधील एका सोसायटीत जमीन आहे. टिपू पठाणने कागदपत्रांत फेरफार करून ती बळकावण्याचा प्रयत्न केला, तसेच जागा सोडण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
टिपू पठाण टोळीची हडपसरमध्ये दहशत असून, यापूर्वीही त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण करतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. याप्रकरणी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तसेच या गुन्ह्यात त्याचा भाऊ एजाज सत्तार पठाण (वय ३९, रा. सय्यदनगर) यालाही अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी एजाज पठाण याला ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT