पुणे

केवळ पात्र लाभार्थ्यांनाच पैसे

CD

पुणे, ता. १ : ‘‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचेही अर्ज आले आहेत. त्यांनी अर्ज करणे चुकीचे होते. यापुढे केवळ पात्र लाभार्थ्यांनाच पैसे दिले जातील,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच दिलेले पैसे मागे घेतले जाणार नाहीत, मात्र यापुढे काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
कृषी हॅकेथॉनच्या उद्‍घाटन कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्याकडे निवडणुकीमुळे कमी वेळ होता. तपासणीसाठी आवश्यक वेळ मिळाला नाही. मासिक उत्पन्न जास्तीत जास्त २० हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या. आम्ही तसे आवाहनही केले होते. आम्हाला असे वाटले होते की, ज्या महिला योजनेमध्ये पात्र नाहीत, त्या अर्ज करणार नाहीत. परंतु काहींनी अर्ज केले. त्यांनी अर्ज करायला नको होते.’’
पवार म्हणाले, ‘‘पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटे गृहित धरून अर्थसंकल्पात तरतूद केलेली असते. केंद्र सरकारकडूनही मदत मिळते. पंचनामे झाल्यानंतर प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. सदाशिव पेठेतील अपघाताची माहिती घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी राज्य आयोगाला विनंती करू.’’

आमदारांवर कारवाईचा प्रश्न नाही
नागालॅंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पक्ष सोडल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘नागालँडचे सात आमदार मध्यंतरी भेटून गेले. कामे होत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. सत्ताधाऱ्यांना समर्थन आहे. मी त्यांच्याशी बोलतो, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर मी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो. आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मध्यस्थी करण्यास सांगितले होते. मात्र, आता सातही आमदारांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईचा प्रश्न येत नाही.’’


कोकाटेंना मनात ठेवायची सवय नाही
कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याबाबत पवार त्यांच्यासमोरच म्हणाले की, शेतकऱ्यांबाबत वक्तव्ये करू नका, असे कोकाटे यांना सांगितले आहे. शेतकरी सर्वांचा पोशिंदा आहे. काही गोष्टी बोलायच्या नसतात. त्यांना मनात ठेवायची सवय नाही; पण मला ते महागात पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest Crime Data : जंतर-मंतरवरील आंदोलनात घुसले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १००० लोक; AI ने ओळखले चेहरे, पोलीसही चकित

हार्दिक पांड्यासाठी फक्त CSK नाही, तर 'हा' संघही करतोय प्रयत्न! थेट कर्णधारालाच Mumbai Indians सोबत ट्रेड करण्याची चर्चा

Latest Live Updates Marathi : उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीत ६१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा

Paris Knife Attack: पॅरिस हादरलं! गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूहल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, म्हटला "मला अल्लाहने पाठवलं"

PM Modi Video Meta Apology : गलतीसे मिस्टेक! PM मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक, मेटाने चूक कबूल करत मागितली माफी

SCROLL FOR NEXT