पुणे

CD

काडीमोडीनंतर मुलांमुळे पुन्हा फुलला संसार

दिलासा सेलचेही योगदान ः आजअखेर १९९ प्रकरणे निकाली

अहिल्यानगर, ता. ७ ः कौटुंबिक वादांमुळे न्यायालयाची पायरी चढणाऱ्या दाम्पत्यांची संख्या वाढत असली, तरी संवाद, मध्यस्थी आणि समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांमध्ये पुन्हा सलोखा निर्माण होत असल्याचे सकारात्मक चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, न्यायालयात दाखल झालेल्या काही घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये समुपदेशनानंतर पती-पत्नींनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेत दावे मागे घेतले आहेत. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयांमध्ये समुपदेशनाची भूमिका अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

पती-पत्नीमधील मतभेद, संवादाचा अभाव, आर्थिक ताण, कौटुंबिक हस्तक्षेप, व्यावसायिक धावपळ आणि बदलती जीवनशैली यासारख्या कारणांमुळे कौटुंबिक वादांच्या प्रकरणांत वाढ होत आहे. यातील काही प्रकरणे थेट घटस्फोटाच्या मागणीपर्यंत पोहोचत असली, तरी न्यायालयाकडून समुपदेशनासाठी दिल्या जाणाऱ्या संधीचा अनेक दाम्पत्यांना लाभ होत आहे. समुपदेशकांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेत संवाद वाढविण्यावर भर दिला जात असल्याने अनेक गैरसमज दूर होत आहेत. नुकतेच काही नवीन दावे दाखल झाले असले, तरी त्याचबरोबर समुपदेशनाच्या प्रक्रियेनंतर अनेक प्रकरणांमध्ये सामोपचाराने तोडगा निघाल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

विशेषतः लहान मुले असलेल्या दाम्पत्यांमध्ये वाद मिटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. मुलांच्या शिक्षणावर, मानसिक आरोग्यावर आणि भावनिक विकासावर आई-वडिलांमधील मतभेदांचा परिणाम होऊ नये, या भावनेतून अनेक जोडपी तडजोडीची भूमिका स्वीकारत आहेत. समुपदेशनाच्या प्रक्रियेत केवळ कायदेशीर बाजू नव्हे, तर नातेसंबंध टिकविण्याच्या शक्यता, परस्पर संवाद आणि जबाबदाऱ्यांवरही भर दिला जात असल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रकरणात विभक्त होणे हा एकमेव पर्याय नसतो. अनेक वेळा संवादाचा अभाव, गैरसमज किंवा तणाव यामुळे परिस्थिती चिघळलेली असते. अशा वेळी समुपदेशनामुळे दोन्ही बाजूंना एकमेकांची भूमिका समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे न्यायालयीन लढाई टाळून सामंजस्याने मार्ग काढणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
------
भरोसा सेलकडे दाखल तक्रारीनंतर आम्ही पती-पत्नीचे समुपदेशन करतो. छोट्या मोठ्या वाद, गैरसमज कॉन्सिलिंगच्या मार्फत दूर करतो. घटस्फोट झालेली काही दाम्पत्य विभक्त झाल्यानंतर मुलांचे होणारे हाल पाहून पुन्हा एकत्र येतात.
- प्रियांका आठरे, पोलिस उपनिरीक्षक, भरोसा सेल
-----
पती व पत्नीमध्ये असलेल्या इगोमुळे त्यांच्यात वाद होता. इगो कमी न झाल्याने घटस्फोटांपर्यंत प्रकरणे जातात. मात्र, मुलांच्या भविष्याची चिंता लागल्यानंतर मग त्यांच्यातील इगो कमी होऊन ते मुलांसाठी पुन्हा एकत्र येतात. ही चांगली बाब आहे. अशा पुन्हा एकत्र संसार करण्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत. घटस्फोटाच्या निकालापर्यंत आलेल्या काही प्रकरणात पुन्हा पती-पत्नी एकत्र आलेले आहेत.
-शिवाजी कराळे, अध्यक्ष, कौटुंबिक वकील संघ, अहमदनगर
-------
एकूण प्रकरणे ः ११४३
तडजोड झालेली प्रकरणे ः १९९
स्वतंत्र निर्णय ः ३११
दप्तरी नोंद ः १५०
डी. व्ही. ॲक्ट ः ४२
गुन्हा दाखल ः १०२
----------
दिलासा विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी
पोलिस उपनिरीक्षक एक
सहायक फौजदार ः एक
महिला पोलिस हवालदार ः दोन
महिला पोलिस नाईक ः दोन
महिला पोलिस नाईक ः दोन
महिला पोलिस कॉन्स्टेबल ः तीन
पोलिस कॉन्स्टेबल ः एक
चालक एसएसआय ः एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रूममध्ये... बॉलिवूड हिरोच्या पत्नीने मागे लावली डिटेक्टिव्ह; झाले धक्कादायक खुलासे

Karanja Crime : गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Marathi News Live Updates : शेतातील झोपडीत रंगला जुगाराचा अड्डा, गुन्हे शाखेच्या छापा, नऊ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT