पुणे

लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धा २

CD

विद्या व्हॅली स्कूलची दोन गटातून बाजी

पुणे, ता. १९ ः लॉयला स्कूल आणि एक्स-लॉयला ॲल्युमनी नेटवर्क (इलान) आयोजित लॉयला करंडक शालेय फुटबॉल स्पर्धेत विद्या व्हॅली स्कूलने बारा व चौदा वर्षांखालील गटांत जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलला नमविले.
पाषाण येथील लॉयला स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात विद्या व्हॅलीने जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलवर ५-० असा विजय मिळविला. त्यात महत्त्वाचा वाटा आदित्य द्विवेदी (तिसरे व पाचवे मिनिट) आणि एकांश ओझाने केलेल्या (चौथे व १५वे मिनिट) प्रत्येकी दोन गोलचा होता. त्याला रिहान्श प्रसारने एक गोल करून सुरेख साथ दिली. या गटातील दुसऱ्या लढतीत मोझेस गवारेने खेळाच्या अठराव्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर विद्याभवन स्कूलने द कल्याणी स्कूलला नमविले.
चौदा वर्षांखालील गटात विद्या व्हॅलीने जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलवर ३-० असा विजय मिळवला. या वेळी अर्जुन भाटियाने (१२वे व २४वे मिनिट) दोन, तर आदिराज फाळकेने एक गोल केला.
या गटातील दुसऱ्या सामन्यात अक्षय आगरवालने केलेल्या (चौथे, सातवे, १२वे व ३२वे मिनिट) हॅटट्रिकसह केलेल्या चार गोलच्या जोरावर द कल्याणी स्कूलने विद्याभवन स्कूलचा ४-० असा सहज पराभव केला.
सोळा वर्षांखालील गटात डॅनिश गोनालने (२७, ५० व ५४वे मिनिट) केलेल्या तीन गोलच्या जोरावर जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलने विद्या व्हॅली स्कूलचा ५-० अशा गोलने पराभव केला. या वेळी डॅनिश गोनालला रुग्वेद घुले (४४वे मिनिट) तनविश खैरनारने (५६वे मिनिट) प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली.
या गटातील विद्या भवन स्कूल आणि द कल्याणी स्कूल यांच्यातील दुसरी लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

'सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत'; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT