पुणे

महामार्गाच्या सुमार दर्जामुळे पुसेगावकर हैराण; रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी

CD

पुसेगावमध्ये महामार्गाला तडे

पुलांवरील काँक्रिट उखडल्याने लोखंडी गज उघडे; रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांत नाराजी

ऋषिकेश पवार : सकाळ वृत्तसेवा
पुसेगाव, ता. ८ : पुसेगाव हद्दीतील सातारा- टेंभुर्णी ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गाचे काम होत असताना महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा दर्जा राखला गेला नसल्याने महामार्गाला तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी पुलांवरील काँक्रिट उखडून आतील लोखंडी गज उघडे पडले आहेत. परिणामी, महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा सुमार दर्जा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
सन २०१९ पासून पुसेगाव हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. जागेची उपलब्धता झाली नसल्याने हनुमान मंदिर चौक ते श्री सेवागिरी मंदिरापर्यंतचे काम अजूनही रखडलेले आहे. या भागात रस्ता खणला असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. सातारा आणि दहिवडी अशा दोन्ही बाजूने महामार्गावरून वेगाने वाहने आल्यानंतर अचानक मुरमाचा कच्चा रस्ता लागत असल्याने येथे अपघाताचा धोका वाढला आहे, तसेच या भागात पाणी साचून होणाऱ्या चिखलामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाल्याचे नागरिक सांगत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा दर्जा राखला गेला नसल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. थोड्या कालावधीत रस्त्यावर भेगा निर्माण होणे, काँक्रिटचा थर उखडला जाऊन खड्डे निर्माण होणे, काँक्रिटच्या पृष्ठभागावरील गुळगुळीतपणा खराब होऊन त्याखाली असणारी खडी उघडी पडणे, लोखंडी गज उघडे पडणे आदी प्रकार घडत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
दरम्यान, याच महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील नेहमी वर्दळ असणाऱ्या विसापूर फाटा तसेच लगतच्या नेर फाट्यावर रस्त्यांची माहिती देणारे दिशादर्शक फलक, मार्गदर्शन सूचना फलक, रबलिंग स्ट्रीप, वेग प्रतिबंधक, रिफ्लेक्टर, ब्लिंकर आदी वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांची वानवा असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. संबंधित विभागाने अपघात रोखण्यासंदर्भात या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
दरम्यान, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने ठेकेदार कंपनीने या समस्यांवर उपाययोजना करून तातडीने महामार्गाचे काम पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी होत आहे.

कोट -
सातारा- लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिरानजीक असलेल्या पुलाचे काँक्रिट उखडून आतील लोखंडी गज उघडे पडले आहेत. दिवसेंदिवस पुसेगाव हद्दीतील या महामार्गाला अनेक ठिकाणी तडे जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- मदन जाधव, ग्रामस्थ पुसेगाव.

चौकट
---------
गटारांचे काम रखडले
------------------
पुसेगाव- वडूज रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल साईशपर्यंतचे दोन्ही बाजूच्या गटारांचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. परिणामी, गावातील मुख्य चौकात रस्त्यावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा नाहक त्रास दररोज सहन करावा लागत असल्याने वाहनचालक, व्यावसायिक तसेच नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT