पुणे

मान्सून टास्क फोर्स अंतर्गत क्रमांक 11 ची नगरसेवकांकडून पाहणी

CD
फोटो : B10295 सातपूर : प्रभाग ११मध्ये पाहणी करताना सभापती समाधान देवरे, नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे -- नागरी समस्यांवर तातडीने कारवाईचे निर्देश मॉन्सून टास्क फोर्सची प्रभाग ११ मध्ये पाहणी सातपूर, ता. १६ : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या कमी करून परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आपत्तीमुक्त ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून मॉन्सून टास्क फोर्स हा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील स्वारबाबानगर, सातपूर गाव आणि महादेवनगर परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, सोनाली भंदुरे आणि मानसी शेवरे यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दौऱ्यात प्रामुख्याने पावसाचे पाणी साचणाऱ्या जागा, ड्रेनेजची समस्या, अतिक्रमणामुळे निर्माण होणारे अडथळे, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता आणि मलेरियाचा वाढता धोका यासारख्या नागरी समस्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची नोंद घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश लोकप्रतिनिधींनी दिले. या संयुक्त पाहणीत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूूलन विभाग, ड्रेनेज विभाग, मलेरिया विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, विजय भंदुरे, तुषार तुषारे, चंद्रकिशोर मुंदडा यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT