पुणे

मे-जून महिन्यात मंगल कार्यालये हाऊसफुल

CD

कात्रज, ता. ८ : यावर्षी एप्रिल महिन्यात विवाहाचे मुहूर्त नव्हते. मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून विवाहाच्या मुहूर्ताला सुरवात झाली आहे. त्यामुळे मे आणि जून या दोन्ही महिन्यात प्रत्येक खासगी मंगल कार्यालयात १४ ते १५ बुकिंग झाले आहेत. यंदा विवाह सोहळ्याच्या खर्चातही जवळपास १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बँड, मजुरी, मंडप, मंगल कार्यालयाच्या खर्चात वाढ झाली असली तरी घराघरात विवाहाचा उत्साह दिसून येत आहे.
दोन वर्षे कोरोना महामारीमुळे समारंभांवर बंदी आली होती. त्यामुळे अनेक व्यवसाय डबघाईला आल्याचे पाहायला मिळाले. मंगल कार्यालयात ५० जणांनाच उपस्थितीचे नियम लादले होते. त्यामुळे कमी खर्चात विवाह पार पडले. आता थाटामाटात सोहळे पार पाडता येणार असल्याने कार्यालयाच्या बुकिंगसाठी कसरत करावी लागते आहे.
आरोह मंगल कार्यालय, पंडित फार्मर्स, महालक्ष्मी लॉन्स, आनंद मंगल कार्यालय, शुभारंभ, सिद्धी लॉन्स, मुहूर्त लॉन्स, वर्धमान गार्डन अशा प्रकारची विविध मंगल कार्यालये पुणे शहरात असून त्यांच्याकडे तारखांसाठी जोरदार मागणी आहे.

या तारखांना मोठी मागणी
मे - ७,९,११,१२,१५,१६,२२,२९,३०
जून - १,७,११,१२,१३,२३,२६,२७,२८,३०

हॉटेल, कार्यालयांतर्फे पॅकेज
कमी लोकांच्या उपस्थितीत चांगल्या हॉटेलमध्ये कार्य करण्याकडे सध्या लोकांचा कल आहे. अशा परिस्थितीत हॉटेलकडून पॅकेज देण्यात येत आहे. २०० ते ५०० जणांच्या उपस्थितीत होणाऱ्या विवाहासाठी वेगवेगळे पॅकेज आकारण्यात येतात. त्याचबरोबर, आता मंगल कार्यालयांकडून केवळ लॉन्स किंवा कार्यालय उपलब्ध न करून देता त्यामध्ये विविध प्रकारच्या पॅकेजेचा समावेश करण्याकडे कल वाढला आहे. नागरिकांचीही सर्व गोष्टी एकाच छताखाली मिळाव्यात अशा अपेक्षांमध्ये वाढ होत आहे.

पूर्वीप्रमाणे विवाहासाठी मोठ्या प्रमाणावर नातेवाईक-आप्तेष्ट किंवा संबंधातील लोकांना बोलविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जेमतेम आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत कार्य करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मुहूर्तानुसार कार्यालयांचे बुकिंग असले तरी त्याप्रमाणात लोकांकडून होणाऱ्या खर्चावर मर्यादा आल्याने मंगल कार्यालयांचा व्यवसाय जेमतेम नफ्यावर चालत आहेत.
- कुणाल बेलदरे, संचालक, आरोह गार्डन, कात्रज

पूर्वीच्या काळात साधारणतः एका लग्नाला सरासरी दोन ते अडीच हजार लोक जमत. परंतु कोरोनानंतर हा कल कमी झाला. यावर्षी बंधने नसल्यामुळे आणि मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून साधारणतः हजारापासून दोन हजारांपर्यंत लोक जमत असल्याचे दिसून येत आहे.
- आशिष मालपेकर, महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर

लोकांचा हॉटेलमध्ये लग्न करण्याचा कल वाढत आहे. भव्यता आणि सर्व सुखसोयी एकाच छताखाली मिळत असल्यामुळे हा कल वाढला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक म्हणून आम्हाला फायदा होत आहे. तसेच पुढील दोन महिन्यात लग्नाचे मूहूर्त चांगले असल्याने हॉटेलला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे.
- केतन शहा, संचालक, हॉटेल टिप टॉप इंटरनॅशल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT