पुणे

लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीला उत्साह

CD

कात्रज, ता. १० : मे आणि जून महिना म्हणजे लग्नसोहळ्यांची लगबग. त्यामुळे सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. सोने-चांदीच्या भावामध्ये नेहमीच चढ-उतार होत असतात. मात्र, यंदा लग्नसराईमुळे मागणीमध्येही १० ते २० टक्के वाढ झालेली आहे.

कोरोनाच्या सावटानंतर लग्नकार्यासाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सोने-चांदीच्या भावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी २० टक्के वाढ झाली असून, सराफा पेढीत ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. याशिवाय, सराफा पेढ्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देऊ केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी सोने घडणावळीवर आकर्षक सवलती दिलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह आहे.

लग्नसराईसाठी मुख्यतः पारंपरिक दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. भाववाढ झाल्यामुळे कमी वजनाचे कास्टिंगचे दागिने खरेदी करण्याला ग्राहकांची पसंती असल्याचे पीएनजी ॲण्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सांगितले.

या दागिन्यांना मागणी
मंगळसूत्र, हार, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, झुमके तसेच अंगठी, साखळी, ब्रेसलेट आदी दागिने ग्राहकांच्या बजेटनुसार सराफा पेढीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, लग्नांमध्ये विविध दागिने भेट म्हणून देण्याचा ट्रेंड असून, त्यानुसार ग्राहक सोने-चांदीच्या वस्तूंची निवड करीत आहेत.

सोने-चांदीचे सरासरी भाव (ता. १० मे)
- सोने २४ कॅरेट - ६१,९१३ रुपये (प्रति १० ग्रॅम)
- सोने २२ कॅरेट - ५७,६२२ रुपये (प्रति १० ग्रॅम)
- चांदी - ७६,६०० रुपये (प्रति किलो)

लग्नकार्यासाठी करण्यात येणारी खरेदी ही भाववाढ झाली म्हणून टाळता येत नाही. ती करणे गरजेचे असते. त्याचबरोबर, सोने-चांदीचे भाव शक्यतो कमी होत नाहीत. ते वाढतच असतात. त्यामुळे किमतीचा विचार न करता आवश्यक दागिने खरेदी करावे लागतात.
- माधुरी काळे, ग्राहक

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोने-चांदीची खरेदी वाढत असली तरी भाववाढ झाल्याने थोडा फरक पडत आहे. लग्नकार्यावेळी प्रत्येकाचे बजेट असते. त्यानुसार खरेदी होते. आता बजेट वाढवले तरी भाववाढीमुळे हवे तेवढे दागिने खरेदी करता येत नाहीत. मात्र, ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर आहे.
- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

सोने-चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी लोकांनी ही भाववाढ मान्य करून खरेदी सुरू ठेवली आहे. ग्राहक बजेटनुसार खरेदी करत आहेत. यापुढे भाववाढ होणार असल्याचे ग्राहक अपेक्षित धरून खरेदी करत आहेत.
- राजेश सोनी, भागीदार, एचपी ज्वेलर्स

सध्याची परिस्थिती पाहता सोने-चांदीच्या भावात वाढ होणार आहे, हे गृहित धरून ग्राहक खरेदी करत आहेत. भाववाढ झाली म्हणून ग्राहक खरेदी करण्याचे थांबलेले नाहीत. यापुढेही दागिन्यांची जोमात खरेदी होईल, असा आमचा अंदाज आहे.
- शैलेश रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT