पुणे

अपघात

CD

वाघोलीत अपघातांमध्ये
दोन तरुणांचा मृत्यू

वाघोली, ता. १० : वाघोली परिसरात भरधाव अवजड वाहनांमुळे दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. नगर रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. लोणीकंद येथील विठाई पेट्रोल पंपाजवळ तीन मार्च रोजी हा अपघात झाला. विकास बाबूराव चव्हाण (वय ३६, रा. लोणीकंद) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरा अपघात कोलवडी येथे गुरुवारी (ता. ७) मध्यरात्री झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. नीरज भारत दळवे (वय २०, रा. सोलापूर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी वैभव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, वाघोलीसह परिसरात अपघातांचे सत्र सुरू आहे. केवळ नगर महामार्गावरच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांवरही अपघात होत आहेत. यात पादचारी आणि दुचाकीस्वारांचा बळी जात आहे. २३ फेब्रुवारी रोजी रात्री शशांक धाबेकर हा तरुण टँकरच्या मागील चाकाखाली आल्यामुळे मृत्यूमुखी पडला होता. यानंतरही शहर वाहतूक शाखेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Gandhi: ज्योतिषाने म्हटलेलं, संजयची जीवनरेषा छोटी आहे; चामुंडेच्या पुजाऱ्यानेही दिला होता इशारा, इंदिरा गांधी घाबरल्या...

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट

SCROLL FOR NEXT