सिंहगड रस्ता, ता. १९ : खडकवासला विधानसभा मतदारसंघाकरिता २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे सिंहगड महाविद्यालय, आंबेगाव बुद्रुक येथील खडकवासला निवडणूक कार्यालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहाय्यक निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, नायब तहसीलदार सचिन आखाडे, अधिकारी अंकुश गुरव, प्रशिक्षक प्रा. माधुरी माने, तुषार राणे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान डॉ. माने यांनी सूक्ष्म निरीक्षकांना मतमोजणी प्रक्रियेची काळजीपूर्वक समज करून घेण्याचे मार्गदर्शन केले. प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन तत्काळ घ्यावे, असे ते म्हणाले. किरण सुरवसे यांनी मतमोजणी प्रक्रियेबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी गोपनीयतेची शपथ, मतमोजणी बैठक व्यवस्था, कर्मचारी संख्या, ईव्हीएम मतमोजणी, १७ सी फॉर्म आणि टपाली मतदान मोजणी प्रक्रियेची माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी कक्षात मोबाईल वापरण्यास बंदी असल्याने निरीक्षकांना मोबाईल सोबत न आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.