वाघोली, ता. १२ ः शेअर बाजार व्यवसायात गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवत वाघोलीतील दोघांना आणि लोणीकंद येथील एकाला सायबर चोरट्यांनी तब्बल ८० लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी वाघोली व लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत वाघोलीतील ४८ वर्षीय व्यक्तीला अनोळखी व्हॉटसॲप ग्रुपमध्ये परस्पर समाविष्ट केले. बनावट फायद्याचे स्क्रीनशॉट अनेकांनी ग्रुपवर टाकून फायदा झाल्याचे भासविले. फिर्यादीने विश्वास ठेवून सुरुवातीला थोडे पैसे पाठविले. त्यानंतर वेळोवेळी ३९ लाख ८५ हजार रुपये विविध बँक खात्यात पाठवून गुंतवले. पैसे परत मिळत नाही व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत वाघोलीतील ४४ वर्षीय तरुणाला अशाच प्रकारे शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवून ३४ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला. पैसे परत मिळत नाही आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिसऱ्या घटनेत लोणीकंद येथील ४९ वर्षीय व्यक्तीला अशाच प्रकारचे शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवून पाच लाख ५४ हजार रुपयांना गंडा घातला. पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.