पुणे

मगर महाविद्यालय, साधना शाळेत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्याने

CD

हडपसर, ता. १८ : येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय व साधना शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

मगर महाविद्यालयात समीक्षा थोरात या बाल व्याख्यातीचे व्याख्यान झाले. ती म्हणाली, ‘डॉ. आंबेडकरांनी न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे येथील गुलामगिरी नष्ट करण्याचे काम केले. स्त्रिया, वंचित, शोषित, कष्टकरी, दलितवर्गाला त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले. भारताला एकसंध राखण्यासाठी नवी मूल्यव्यवस्था निर्माण केली. त्यांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत.’

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यवसाय अभ्यासक्रमाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. रमाकांत जोशी, डॉ. अजय कवाडे, प्रा. अनिल देवकाते, डॉ. उज्वला खिस्ती, शिवाजी सोनवणे, महेंद्र थोरात, चांगदेव पोमण, सचिन शिंदे, राजू आवटी, साधना काळभोर, आशा बांदल आदी उपस्थित होते. डॉ. नाना झगडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. विलास मोरे यांनी आभार मानले.

साधना शाळेमध्ये प्राचार्य दत्तात्रेय जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ वाचन, लेखन, चिंतन व मनन याच बळावर विश्वरत्न ठरले. ‘शिका, संघटित व्हा आणि चळवळ करा’ असा समाजाला त्यांनी कानमंत्र दिला. त्यांच्या विचाराने पुढे गेल्यास देशाच्या विकासात मोठा हातभार लागेल.’’
दरम्यान, या वेळी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त घेतलेल्या निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शिक्षक आशिष कांबळे, विद्यार्थी गंधर्व वाव्हळ, सुशांत शिंदे, रोहन मेंडके, क्रांती चव्हाण यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. अमोल डायरे यांनी डॉ. आंबेडकरांवरील कविता सादर केली.

उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक अजय धनवडे, साधना सुर्वे, अनिल मेमाणे, ज्ञानोबा हुगे, सुशीला शिरसाट, अमृता चितळे, करुणा शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. अनिल वाव्हळ यानी प्रास्ताविक केले. रूपाली सोनावळे यांनी सूत्रसंचालन, तर सविता पाषाणकर यांनी आभार मानले.
................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला डेब्यू का मिळालं नाही? संजय मांजरेकरांनी सांगितलं मोठं कारण

दुचाकीवर आई-वडील नशेत, ४ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडलं; ४०० मीटरपर्यंत लक्षातच आलं नाही, नंतर... पोलिसांनी सांगितली धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?

SCROLL FOR NEXT