पुणे

बसचालक, मदतनीसाला वाघोलीमध्ये लुटले

CD

वाघोली, ता. २६ ः रात्रीच्या वेळी खासगी बसमध्ये घुसून बसचालक व त्याच्या मदतनीसास धमकावून त्यांच्याकडील साडे सात हजार रुपये लुटल्याची घटना वाघोलीत बाराच्या सुमारास बकोरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. पाटोदा, जि. बीड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी घेत बस बीडला निघाली होती. वाघोलीत बकोरी फाट्यावर प्रवाशांना घेण्यासाठी बस थांबली असता, तिघेजण बसमध्ये घुसले. त्यांनी चालक मिसाळ, मदतनीस संतोष ठोकळ, पुढे बसलेले प्रवासी ऋषिकेश सानप (वय २४, रा. बीड) यांना धमकावून पैसे मागितले. चालक व मदतनीस यांच्याकडील साडेसात हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यांना मारहाण करून तिघे खाली उतरले. यानंतर एका लाल रंगाच्या स्विफ्टमधून निघून गेले.
----------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT