पुणे

औंध, बोपोडीत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये करणार वृक्षारोपण

CD

औंध, ता. २९ : औंध, औंधरस्ता, बोपोडी, खडकीरस्ता परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहतूक कोंडी, अपघात होत आहेत. याबाबत निवेदन देऊनही औंध, बाणेर क्षेत्रीय कार्यालयामार्फत कार्यवाही होत नसल्यामुळे, रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
येत्या शुक्रवारी (ता. १) हे आंदोलन करणार असल्याचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी सांगितले. याबाबत त्यांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांना पत्र देऊन वृक्षारोपण आंदोलनास उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
‘‘औंध, बोपोडी, खडकी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत. तसेच रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यातील खड्डे बुजवावेत अशी विनंती आम्ही पक्षाच्या‌ वतीने शनिवारी (ता. २६) सहायक आयुक्तांना पत्राद्वारे केली होती. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यामुळे येथे आम्ही या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत आहोत. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे, आपल्या हस्ते काही खड्ड्यात वृक्षारोपण व्हावे यासाठी शुक्रवारी (ता. १) सकाळी ११ वाजता कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती सहायक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे,’’ माने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ‘आयपीएल’वर सट्टेबाजीचे रॅकेट उघड, इचलकरंजीत सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT