पुणे

वारज्यात गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेला मुलांचा प्रतिसाद

CD

वारजे, ता. १० : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत वारजे येथील पॉप्युलर गिरिधरनगर सोसायटीमधील गणपती मंदिरात शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा मोफत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये १० वर्षांवरील जवळपास १०० मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमातून मुलांनी स्वतःच्या हाताने गणरायाची मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला.

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणाची जाणीव ठेवून शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुलांनी अत्यंत एकाग्रतेने आणि कल्पकतेने गणपतीच्या मूर्ती तयार केल्या.

या कार्यशाळेला भावना पाटील, शोभा खिरीड, योगिनी विश्वब्राह्मण, निशा पारखी, स्वाती पवार, शीतल पाटील, प्रिया बाविस्कर, नमिता त्रिपाठी यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मूर्ती बनविण्याचे तंत्र जाणून घेतले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवीत मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. या कार्यशाळेमुळे मुलांना केवळ मूर्ती बनविण्याचा अनुभवच मिळाला नाही, तर पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही त्यांना समजले, अशी माहिती आयोजक भावना पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत घर नाही सांगून बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा चौपाटीवर आलिशान फ्लॅट, खरेदी केल्यापासून बंदच, कोट्यवधी रुपये किंमत

Panchang 13 August 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

Solapur News:'५० हजार बहिणी पाठविणार देवाभाऊंना राख्या'; स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महिला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न

Latest Maharashtra News Updates :मनोज जरांगे-पाटील 15 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर; जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठका सुरू

Zilla Parishad : गट, गण प्रारूप रचनेवर सुनावणी पूर्ण; विभागीय आयुक्तांकडून ११५ सूचना व हरकती मान्य; ८८ फेटाळल्या

SCROLL FOR NEXT