पुणे

पोवाडा गायन स्पर्धेत मळवंडी ढोरे शाळेचे यश

CD

वडगाव मावळ, ता. २८ : मावळ पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवांतर्गत नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय पोवाडा गायन स्पर्धेमध्ये मळवंडी ढोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी दुर्वा ढोरे व इतर सहकारी विद्यार्थ्यांनी ‘अफजल खानाचा वध’ या विषयावर पोवाडा सादर केला. तिला संगीत विशारद सोमलिंग रेवणशेट्टे, मुख्याध्यापक राजू भेगडे, धीरजकुमार जानराव, सरोजा अंबुलगे, पूजा राऊत आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ५० मी. धावणे स्पर्धेमध्ये युवराज वाघमारे याने तृतीय क्रमांक व वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये दुर्वा ढोरे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हा बालकुमार साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट कविता सादरीकरण केल्याबद्दल श्रेया ढोरे हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
मावळ तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, नगरसेवक सुदाम शेळके, नगरसेविका हेमलता खळदे, शिक्षण विस्ताराधिकारी संदीप काळे, केंद्रप्रमुख निर्मला काळे, केंद्रप्रमुख बाळासाहेब घारे, शांताराम भागीत, शामराव इंदोरे, मुकुंद तनपुरे, तानाजी शेखरे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सरपंच गोरख ढोरे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट ढोरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

SCROLL FOR NEXT