पुणे

मावळात अडीचशे एकर ऊस क्षेत्रावर ड्रोन फवारणी

CD

वडगाव मावळ, ता. १२ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत विविध गावांतील सुमारे २३० एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे यशस्वी फवारणी करण्यात आली आहे.
ऊस उत्पादन वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्र (बारामती), वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी) आणि कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांनी सांगितले की, ‘‘या योजनेत २१ शेतकरी सहभागी असून दोन स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली आहेत. उपग्रह मॅपिंग आणि सेन्सरद्वारे शेतकऱ्यांना खत, पाणी व्यवस्थापन व रोगराईची पूर्वसूचना अ‍ॅपवर मिळत आहे.’’
‘‘या तंत्रज्ञानामुळे ३० ते ४० टक्के कीटकनाशकांची बचत होऊन उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे,’’ असे कार्यकारी संचालक एस.जी. पठारे यांनी नमूद केले.
नुकतीच मरकळ येथे ड्रोनद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अनिल लोखंडे, माजी संचालक राजाराम लोखंडे, बाळासाहेब लोखंडे व शेती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सोमाटणे, कासारसाई, पवनानगर आणि मरकळ गटातील विविध गावांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT