पुणे

‘इको गणपती कार्यशाळे’त मुलांच्या कल्पकतेला वाव

CD

घोरपडी, ता.२४ : ‘सकाळ एनआयई’च्या वतीने रविवारी (ता. २४) आयोजित ‘इको गणपती बनवा’ या कार्यशाळेस मुलांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धिविनायक ग्रुप व इंद्रिया ज्वेलर्सच्या सहकार्याने बंडगार्डन येथील इंद्रिया ज्वेलर्सच्या दालनासह ११ ठिकाणी ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेचे उद्घाटन सिद्धिविनायक ग्रुपचे प्रमुख राजेशकुमार सांकला यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इंद्रिया ज्वेलर्सचे मार्केटिंग मॅनेजर अंकुश पाटील, प्रशांत अक्कीवटे, उज्ज्वला आंग्रे, ‘सकाळ’ माध्यम समूहातील नवीन उपक्रम विभागप्रमुख हेमंत वंदेकर आणि ‘एनआयई’ प्रोजेक्ट प्रमुख दिलीप जाधव उपस्थित होते.

बंडगार्डन येथील इंद्रिया ज्वेलर्समधील कार्यशाळेला सुमारे शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी व पालक या उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी गणपती बनविण्याचा मनमुराद आनंद लुटला. गणपतीची मूर्ती बनवल्यानंतर सर्व मुलांनी खाऊचा आस्वाद घेतला. गणरायाचा जयघोष करीत बनवलेली मूर्ती मुले घरी घेऊन गेले. या उपक्रमात माहेर आणि बालग्राम एस. ओ. एस. चिल्ड्रेन्स व्हिलेजेस, महाराष्ट्र संस्थेतील लहान मुलांनी सहभाग घेऊन सर्जनशीलतेचा आनंद घेतला, तसेच इंद्रिया ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून वेळ काढून गणपती मूर्ती बनवली.

औंधमधील नेक्सस वेस्टएंड मॉल, मगरपट्टा सिटीतील अमनोरा मॉल, एरंडवण्यातील रिलायन्स मॉल, पिंपरीमधील इंद्रिया ज्वेलर्स, पिसोळीतील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, धानोरीतील स्नगल्स वर्ल्ड प्रीस्कूल, चिखलीतील गणेश इंटरनॅशनल स्कूल, दत्तवाडीतील सत्यनारायण शिवलाल अग्रवाल स्कूल, सिंहगड रस्त्यावरील क्लारा ग्लोबल स्कूलमध्ये ही कार्यशाळा पार पडली. पर्यावरणाला हानी पोहोचू नये व पाण्याचे प्रदूषण होऊ नये, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
--------------------
गणपती म्हणजे बुद्धीची देवता आहे. जो अभ्यास करतो त्याला तो बुद्धी देतो, त्यामुळे सगळ्यांनी खूप अभ्यास करा. शिक्षण घेतले तर आज कोणीही यशस्वी होऊ शकतो. पुण्याला गणपतीचा आशीर्वाद आहे, त्यामुळे सगळ्यांनी भरपूर शिका आणि मोठे व्हा.
- राजेशकुमार सांकला, सिद्धिविनायक ग्रुप, सीएमडी
-----------------
सर्व वयोगटांतील मुलांमधील सर्जनशीलता पाहायला मिळतेय. मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतोय, हे पाहून आम्हाला समाधान वाटतेय.
- हेमंत चौरे, पालक
-----------------------
(लोगो वापरणे)
-----------------------
फोटो नंबर 42825
बंडगार्डन रस्ता : इको गणपती कार्यशाळेत राजेशकुमार सांकला, इतर मान्यवर आणि लहान मुले.
-----------------------
येरवडा : एसएनबीपी शाळेत इको गणपती कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Pune Ward Structure : महापालिकेकडे आत्तापर्यंत प्रभाग रचनेवर १६१ हरकती

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT