पुणे

सेवा धर्मातून ३५ गायींचे संगोपन

CD

मार्केट यार्ड, ता. २२ : समाजातील प्रत्येक व्यक्तीने गायीची सेवा केली पाहिजे. या सेवाधर्माच्या विचारानुसार ओम गुरू आनंद गोशाळेच्या माध्यमांतून ३५ गायींचे संगोपन करण्यात येत आहे. हे काम व्यावसायिक अभय संचेती आणि त्यांचे कुटुंबीय करत आहेत. मागील दहा वर्षांपासून ही सेवा अविरत सुरू आहे
मावडी (सासवड) परिसरात गायींसाठी स्वखर्चातून गोठ्याची उभारणी केली आहे. यामध्ये एकूण ३५ गायींचे संगोपन सुरू आहे. २०१३ मध्ये गोशाळेची स्थापना केली. नव्या पिढीला आणि समाजातील इतर लोकांना गायीचे महत्त्व कळावे, या उद्देशाने गायींचे संगोपन करत आहेत. नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते हा विचार करून दरवर्षी एका वर्षाची चाऱ्याची व्यवस्था करून ठेवण्यात येत असल्याचे मनीष संचेती यांनी सांगितले.
सेवाभाव या वृत्तीने गायींचे संगोपन केले जाते. सर्व सहकारी पूर्ण श्रद्धेने सेवा करत असल्याचे पाहायला मिळते. गायींना याठिकाणी पोषक आहार दिला जातो. यात पेंड, भुसा आदींचा समावेश असतो. सद्यःस्थितीत उसाचे वाढे, घास, ज्वारीचा कडबा आदी चारा गायींना दिला जातो. गोशाळेच्या सेवेसाठी मोहनलाल संचेती, पुकराज संचेती, किशोर संचेती, मनीष संचेती, अशोक श्रीमाळ, धनराज कटारिया, नंदकुमार चोरडिया, दिलीपकुमार दर्डा, राजेंद्र भटेवरा, जेठमल दादीच, विजय शिंगवी, सुरेंद्र श्रीश्रीमाळ, सचिन गदिया, सुरेश वानगोता सहकार्य करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT