पुणे

पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली

CD

मार्केट यार्ड, ता. २ : नवरात्रोत्सवाला आज (ता. ३) पासून सुरूवात होत आहे. त्यामुळे घरोघरी बसविण्यात येणाऱ्या‍ घटाच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परडी, घट आणि मातीच्या किमतीत २० रुपयांनी वाढ झाली आहे. मार्केटयार्ड, महात्मा फुले मंडईसह शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग होती.

घटस्थापनेसाठी माती, परडी, नारळ, दोरा, घट, पाच प्रकारची फळे, चुनरी, हळद-कुंकू, खारीक, बदाम, सुपारी, खोबरे, खडीसाखर, विविध प्रकारचे धान, अगरबत्ती, धुप, आंब्याची पाने, नागलीची पाने, कमळाची फुले, हिरव्या बांगड्या, गजरा तसेच सजावटीची फुले, हार आणि देवीला वाहण्यासाठी फुले लागतात. त्यामुळे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी सर्वत्र लगबग पाहण्यास मिळत होती. आंब्याची पाने, माती, परडी, कमळाची फूल, फुले आदी पूजेचे साहित्य पुणे जिल्ह्यातून विक्रीसाठी बाजारात आले होते. तर उर्वरित साहित्य शहरातील पूजेचे साहित्य विक्रीच्या दुकानात उपलब्ध होते.

सर्व साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सर्वत्र गर्दी होत आहे. यंदा पूजेच्या साहित्याला चांगली मागणी असून काहीप्रमाणात किमती वाढल्या आहेत.
- आशा कानडे,
पूजेचे साहित्य विक्रेत्या

पूजा साहित्याच्या किमती
माती- ८० रुपये (किलो)
परडी- ७० रुपये
घट- ७० रुपये
फळांचे ताट- ५० रुपये
चुनरी- ४० रुपये
नारळ- ३० रुपये
धान्याचे पाकिट- २० रुपये
दोरा- १५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

मोबाईल चार्जिंगने घात केला, स्फोट होताच संपूर्ण घराची झाली राखरांगोळी, नेमकी कुठं घडली घटना?

Redbird Flight Training Academy: बारामतीतील रेडबर्ड फ्लाइट अकॅडमी पुन्हा चर्चेत; पाच वर्षांत अनेक विमान दुर्घटनांची नोंद, AAIB अहवालात धक्कादायक नोंदी!

सासरी गेल्यावर 'या' गोष्टीची सगळ्यात जास्त आठवण येईल... 'तुला जपणार आहे' फेम मीरा म्हणते- मला कधीच...

Gold Import Duty: सोने-चांदीवर 15% इम्पोर्ट ड्युटी! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल इतके जास्त पैसे

SCROLL FOR NEXT