विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

Tamil nadu political drama तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर बहुमताची जुळवाजुळव करताना विजय यांची दमछाक झाली होती. शपथ घेतल्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान मात्र त्यांनी लिलया पेललं.
Vijay Thalapathy

Vijay Thalapathy

esakal

Updated on

Tamil Nadu CM Vijay proves majority as DMK stages walkout in assembly तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेनं काँग्रेसच्या पाठिंब्यानं सत्तास्थापनेसाठी हालचाली केल्या. सुरुवातीला राज्यपालांनी बहुमताचा आकडा मागितला होता. शेवटी टीव्हीकेनं काँग्रेस आणि इतर लहान पक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर शपथविधीही झाला. आता विधानसभेत विजयच्या टीव्हीके पक्षानं बहुमतही सिद्ध केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com