पुणे

सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर

CD

मार्केट यार्ड, ता. १३ : बाजारात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकीच झाली होती. यामध्ये घेवड्याच्या भावात काहीशी वाढ झाली असून मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी राज्यासह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातून हिरवी मिरची १५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी चार टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा चार टेम्पो, राजस्थान येथून गाजर दोन टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून घेवडा तीन टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग शेंगा दोन टेम्पो, हिमाचल प्रदेशातून सहा टेम्पो मटार, कर्नाटकातून पावटा दोन टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून कैरी पाच टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची १० टेम्पो तर इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ५० टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ६५० गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार चार टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची पाच टेम्पो, काकडी १० टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी पाच टेम्पो, ढोबळी मिरची आठ टेम्पो, शेवगा चार टेम्पो, भुईमूग शेंगा दोन टेम्पो, मटार दोन टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, कांद्याची ८० ट्रक आवक झाली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव : कांदा : १००-१३०, बटाटा : १३०-२००, लसूण : ३५०-१०००, आले सातारी : २५०-२७०, भेंडी : २००-४००, गवार : ३००-५००, टोमॅटो : ८०-१३०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी : २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : ३००-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : ४०-८०, वांगी : २००-४००, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी : ५००-५५०, जाड : २५०-३००, शेवगा : १००-२००, गाजर : २५०-४००, वालवर : ५००-५५०, बीट : ७०-८०, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : स्थानिक : ५००-५५०, परराज्य : ५७०-६५०, पावटा : ४५०-५००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : २५०-४००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

कोथिंबीर, शेपू, कांदापात महागली
मार्केटयार्डातील घाऊक बाजारात कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडींची आवक झाली. आवक कमी झाल्याने शेकडा जुडीमागे कोथिंबिरीच्या भावात २००, शेपू २००, कांदापात २००, राजगिरा आणि चुकाच्या भावात प्रत्येकी १०० रुपये वाढ झाली. आवक-जावक कायम असल्याने इतर सर्व पालेभाज्यांचे गेल्या आठवड्यातील भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-१२००, मेथी : १२००-१५००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ३००-६००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ३००-५००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००- ५००, चुका : ६००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१२००.

पपई, डाळिंब स्वस्त, संत्री महाग
फळबाजारात पपई आणि डाळिंबाच्या भावात घसरण झाली असून संत्र्याच्या भावात वाढ झाली आहे. कलिंगड, खरबूज, चिक्कू, अननस, मोसंबी, लिंबू आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळबाजारात मोसंबी ३० टन, संत्रा २० टन, डाळिंब २५ टन, पपई २५ टेम्पो, लिंबांची सुमारे दोन हजार गोणी, कलिंगड ५० टेम्पो, खरबूज ३० टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, अननस सहा ट्रक तर पेरूची २५० क्रेट आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ५००-२०००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन) : ८०-२२०, संत्रा : (१० किलो) : ४५०-१७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१८०, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-२५, कलिंगड : ७-१०, खरबूज : १०-१६, पपई : ८-१५, चिक्कू (१० किलो) : १००-५००, अननस (१ डझन) : १००-६००.
हापूस आंबा : तयार हापूस : ४००-८०० रुपये (डझन), कच्चा हापूस
: १२००-२५०० रुपये (४ ते ७ डझन)


फुलांचे भाव तेजीत
हनुमान जयंती आणि सोमवारी (ता. १४) होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे फुलांची मागणी काही प्रमाणात वाढली होती. त्यामुळे बाजारात झेंडू, गुलछडीसह काही फुलांचे भाव ५ ते १० टक्क्यांनी वाढले होते. तसेच कट फ्लॉवर, शोभिवंत फुलांना मागणी चांगली आहे. आवक वाढली असली तरी मागणीही जास्त असल्याने फुलांचे भाव तेजीत असल्याची माहिती फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर आणि समन्वयक सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १२०-२००, अ‍ॅष्टर : जुडी : १५-२०, सुट्टा : ५०-१२०, कापरी : ३०-५०, शेवंती : ६०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ६०-१००, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : १२०-१८०, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, ऑर्चिड : ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-१००, जिप्सोफिला : १००-१६०, मोगरा : ८००-९००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT