मार्केट यार्ड : केरळ समुद्र किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मासेमारी बंद करण्यात आली आहे. परिणामी मार्च-एप्रिल महिन्याच्या तुलनेत मासळीचे दर दुपटीने वाढले आहेत, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक घटली आहे. बाजारात खोल समुद्रातील मासळीची १० टन, खाडीच्या मासळीची २०० किलो, नदीच्या मासळीची दोन टन, आंध्रचा रहू आणि कतलाची २० टन आवक झाली आहे. आंध्र येथून आलेल्या मासळीच्या आवकेमध्ये कोळंबीची अधिक आवक असल्याने इतर मासळीला फटका बसला आहे. बाजारात सुरमईची तुरळक आवक असून बांगडा आणि बोंबिलची आवक घटली आहे. पुढील दोन महिने मासेमारी बंद असल्याने मासळीची आवक घटणार आहे. त्याचा परिणाम भाववाढ होण्याची शक्यता असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
मासळीचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) : खोल समुद्रातील मासळी : कापरी : १८०-२००, मोठे : १६००-१८००, मध्यम : ११००-१२००, लहान : १०००-१२००, भिला : ८००-९००, हलवा : ८००-९००, सुरमई : १२००-१४००, रावस : लहान : १०००-१२००, मोठा : १५००-१६००, घोळ : १०००-१२००, करली : ५००-५५०, करंदी : ५००-५५०, भिंग : ४००-५००, पाला : १५००-२०००, वाम : १६००-१५००, ओले बोंबील : ४००-५००. कोळंबी : लहान : २४०-३२०, मोठी : ४००-७००, जंबोप्रॉन्स : १५००-१६००, किंगप्रॉन्स : ८००-९००, मोरी : ४००-५००, मांदेली : १६०-२००, राणीमासा : ३००-३५०, खेकडे : ४००-४५०, चिंबोऱ्या : ६००-८००.
खाडीची मासळी : सौंदाळे : ३००-४००, खापी : ३००-४००, नगली : ७००-८००, तांबोशी : ६००-७००, पालू : ४००-४५०, लेपा : ३००-३५०, बांगडा : लहान : ६००, मोठा : ३५०-४००, शेवटे : ३००-४००, पेडवी : १००-१५०, बेळुंजी : २००-२५०, तिसऱ्या : ३००-३५०, खुबे : १००-१५०, तारली : २००-२५०.
नदीची मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-५००, शिवडा : २५०, खवली : २५०-३००, आम्ळी : १२०-१८०, खेकडे : लहान : २५०, मोठे : ४००-५००, वाम : ६००-६५०. मटण : बोकडाचे : ७८०, बोलाईचे : ७८०, खिमा : ७८०, कलेजी : ८२०.
चिकन : २३०, लेगपीस : २८०, जिवंत कोंबडी : १५० बोनलेस : ३३०.
अंडी गावरान : शेकडा : ११२०, डझन : १४०, नग : १२.
इंग्लिश : शेकडा : ५८०, डझन : ८४, नग : ७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.