पुणे

स्वतःला ईश्वराशी जोडा - प्रवीणऋषिजी म. सा.

CD

‘मी फक्त धर्माशी आणि ईश्वराशीच जोडलेला राहीन’ असे आपल्या मनाशी ठरवा. ईश्वर समोर असताना दुसऱ्या कुणाशी जोडून राहणे ही मोठी चूक आहे. तिथे अहंकाराला जागा नसते. ‘ईश्वराशी जोडण्याची सुरवात आजच होऊ शकते’, असा मनाचा निर्धार पक्का हवा.
‘तुमच्या मनात इतर स्वप्न का जन्माला येतात, मुलं-आई-वडिलांपासून वेगळी का होतात, कुटुंब का विखुरतात, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याची इच्छा मनात का येते, संस्था का ढासळतात’ हा सर्व अहंकाराचा खेळ असल्याचे तेव्हाच तुमच्या लक्षात येईल.
‘फोडा आणि राज्य करा’ हेच तत्त्व तुम्हाला सगळीकडे दिसून येईल. ‘माझे अस्तित्व हवे’ या जाणिवेतून सगळे घडत असते. ‘सागरापासून जो थेंब विलग होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहतो, तो वाफ होऊन नाहीसा होतो’, हे कळतही नाही. अशी मनीषा धरणारे सगळेच विरून जातात; परंतु भगवान महावीर हे शाश्वत आहेत.
तुम्हाला जीवनात निःस्वार्थपणे देणारी फक्त तीनच माणसे असतात आणि ती म्हणजे ‘ईश्वर, गुरू आणि आई-वडील’. इतर सगळ्या ठिकाणी फक्त देणेघेणं असतं. सारे काही व्यावहारिक पातळीवर सुरू असते. त्यामुळे अनेकदा तुम्ही ‘मी इतके केले, पण मला काय मिळाले’ असे म्हणून जातात. तुम्ही कधी आई-वडिलांकडून हे शब्द ऐकले आहेत का, कारण त्यांना फक्त देणे माहीत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Dasara Melava: भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर, बीडचं राजकारण तापणार!

पैसा बोलता है! देशात महाराष्ट्र अन् शहरांमध्ये पुणे, भ्रष्टाचारात आघाडीवर; NCRBच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

Dussehra Melava 2025 Live Update : सावरगाव येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, थोड्या वेळात भाषणाला सुरुवात

Gold Shopping: दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी केल्यास काय होते? जाणून घ्या या परंपरेमागील गुपित!

IND vs WI 1st Test Live: W,W,W,W! छा गए 'मियां भाई'; Mohammed Siraj ने मोडला मिचेल स्टार्कचा विक्रम, WTC मध्ये...

SCROLL FOR NEXT