पुणे

Toilet Seva App : स्वच्छतागृह शोधा एका क्लिकवर; पुणे महापालिकेने केले ‘टॉयलेट सेवा ॲप’ विकसित

पुणे शहरात कोणत्या भागात स्वच्छता गृह आहे? जवळचे स्वच्छतागृह कोणते आता हे शोधण्यासाठीही महापालिकेने ‘टॉललेट सेवा ॲप’ विकसित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात कोणत्या भागात स्वच्छता गृह आहे? जवळचे स्वच्छतागृह कोणते आता हे शोधण्यासाठीही महापालिकेने ‘टॉललेट सेवा ॲप’ विकसित केले आहे. त्यामुळे एका क्लिकवर सर्व माहिती समजणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते याचे उद्या (गुरुवारी) उद्घाटन केले जाणार आहे.

शहरात १ हजार १८३ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यांच्या स्वच्छतेसाठी पाच कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे. तसेच सुमारे साडे तीन कोटी रुपये खर्च करून १५ क्षेत्रीय कार्यालयात एक याप्रमाणे १५ आकांक्षी स्वच्छतागृहे बांधली जात आहेत.

अनेकदा नागरिकांना जवळचे स्वच्छतागृह कुठे आहे हे माहिती नसल्याने त्यांची कुचंबणा होते. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने अमोल भिंगे यांनी तयार केलेले ॲप यासाठी वापरले जाणार आहे.

या ॲपमध्ये बेसिन, पाणी, लिक्विड सोप, सॅनिटायजर, डस्टबिन, लाइट, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था असणाऱ्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे दिलेली आहे. या ॲपमध्ये तक्रार व सूचना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी करून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT