पुणे

खेड-शिवापूर टोल नाक्यावरून प्रवास करताय, मग ही बातमी नक्की वाचा

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : "येथील पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्याच्या टोल दरात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. आज (ता. 1 एप्रिलपासून) ही दरवाढ लागू करण्यात येणार असून पुढील एक वर्षासाठी ही टोल दरवाढ असणार आहे," अशी माहिती खेड-शिवापूर टोलनाका प्रशासनाने दिली.

दरवर्षी एक एप्रिलपासून टोल दर बदलले जातात. त्यानुसार यावर्षीही खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल दर बदलले असून त्यात पुढील एक वर्षांसाठी तीन टक्के दरवाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून ही टोलदरवाढ लागू करण्यात येणार आहे. कार आणि जीप या वाहनांना पूर्वी 95 रुपये टोल आकारण्यात येत होता. त्यात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून या वाहनांना आता 100 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. 

हलक्या व्यावसायिक वाहनांना पूर्वी 155 रुपये टोल होता. त्यात 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सुधारीत टोल दरानुसार या वाहनांना आता 160 रुपये टोल द्यावा लागणार आहे. बस आणि ट्रक या वाहनांना पूर्वी 325 रुपये टोल होता. त्यात 15 रुपयांची वाढ करण्यात आली असून या वाहनांना आता 340 रुपये टोल द्यावा लागेल.

अवजड वाहनां पूर्वी 515 रुपये टोल आकारण्यात येत होता. त्यात 15 रुपयांची वाढ करण्यात आली असून या वाहनांना आता 530 रुपये टोल आकारला जाईल. अती अवजड वाहनांना पूर्वी 625 रुपये टोल होता. त्यात आता 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सुधारीत दरानुसार अती अवजड वाहनांना 645 रुपये टोल आकारण्यात येईल. तर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे.

स्थानिक अव्यावसायिक वाहनांच्या फास्टॅग मासिक पाससाठी पूर्वी 275 रुपये आकारण्यात येत होते. त्यात 10 रुपयांची वाढ झाली असून स्थानिक वाहनांच्या मासिक फास्टॅग पाससाठी आता 285 रुपये मोजावे लागणार आहेत.

याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "टोल दर बदलण्याच्या प्रक्रियेत टोल दर कमी पण होऊ शकतात आणि वाढूही शकतात. गेल्या वर्षी खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात वाढ झालेली नव्हती. यावर्षी मात्र टोल दर वाढले असून त्यात तीन टक्के वाढ झाली आहे."

सुधारित टोल नाक्याचा दर
वाहने                               जुना              नवा
कार, जीप                          ९५              १००
हलकी व्यावसायिक वाहने    १५५              १६०
बस आणि ट्रक                   ३२५               ३४०
अवजड वाहने.                   ५१५               ५३०
अती अवजड वाहने             ६२५              ६४५

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT