पुणे

बावड्यातील टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला

CD

नीरा नरसिंहपूर, ता. १५ : सर्वच फळभाज्यांना चांगला बाजारभाव मिळत असताना टोमॅटोला मात्र कवडीमोल भाव मिळत आहे. सध्या प्रतिकिलो मिळत असलेल्या आठ ते १० रुपये भावामुळे उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे बावडा परिसरातील उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.
तरकारी घाऊक बाजारात पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सांगली या भागातून आवक होत आहे. पुण्यातील मार्केटयार्डात सरासरी ७ ते ८ हजार क्रेट आवक होत आहे. मात्र, येथील बाजारातून राज्यातील इतर बाजारांत आणि परराज्यांत टोमॅटो जात असतो. मात्र, विविध जिल्ह्यांसह परराज्यातही टोमॅटोचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे आवकेच्या तुलनेत मालाला उठाव कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि खानावळीवाल्यांकडून टोमॅटोची खरेदी अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. ही एकमेव समाधानकारक बाब आहे. घरगुती ग्राहकांकडून नेहमीच्या प्रमाणातच मागणी असल्याचे ज्येष्ठ आडतदार समीर बागवान यांनी सांगितले, तर वातावरणातील बदलामुळे बाजारात प्रचंड आवक होत असून बाजारात मंदी निर्माण झाली असल्याचे व्यापारी फिरोज बागवान यांनी सांगितले.
बावडा येथील नरसिंहपूर मार्गालगत फिरोज अत्तार यांची टोमॅटोची बाग बाजारभाव पडल्याने सोडून देण्यात आली आहे.

राज्यासह परराज्यात एकाच वेळी टोमॅटो काढणीला आला आहे. त्यामुळे आवकेच्या तुलनेत मालाला उठाव कमी आहे. परिणामी, कवडीमोल भाव मिळत आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाग सोडून दिली आहे.
- फिरोज अत्तार, शेतकरी

सद्यस्थितीत मार्केटयार्डात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यातच आवकेच्या तुलनेत मागणी कमी आहे. परिणामी भावात घसरण झाली आहे. आणखी काही दिवस हीच स्थिती राहील.
- समीर बागवान, टोमॅटोचे व्यापारी

05791

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

मोठी बातमी! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात मांडणार डिलिमिटेशन बिल? बहुमताचं गणित जुळवलं?

Suryakumar Yadav : मैदानावर धुरळा, अन् मग सूर्यकुमारची सामन्यानंतर सरफराज खानसोबत मटण पार्टी! Viral Video

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

Maharashtra Jail Reform : महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता तुरुंगात नव्हे तर मुलाबाळांसह स्वतंत्र वसाहतीत राहता येणार; 'या' दोन शहरांची निवड!

SCROLL FOR NEXT