Corona Patient Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या नऊशेच्या खाली

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.१५) नऊशेच्या खाली आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.१५) नऊशेच्या खाली आली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या मंगळवारी (ता. १५) नऊशेच्या खाली आली आहे. शिवाय पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्ण पाचशेच्या आत आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी विविध रुग्णालयांत केवळ ४९ रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित ८४५ जण गृह विलगीकरणात आहेत. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात फक्त ६३ तर शहरात केवळ १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

याउलट दिवसभरातील जिल्ह्यातील २१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १३७ जण आहेत. दिवसातील नवीन रुग्णांमध्ये पिंपरी चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २१, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पिंपरी चिंचवडमधील ३१, जिल्हा परिषद २८, नगरपालिका १७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जण आहेत.

सद्यःस्थितीतील जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी पुणे शहरातील ४४५, पिंपरी चिंचवडमधील ११८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८७, नगरपालिका हद्दीतील १२२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २२ रुग्ण आहेत. मागील आठवडाभरापासून सातत्याने शून्य मृत्यू होत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज रात्री जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT