Pune News esakal
पुणे

Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून दगडूशेठ गणपती बाबत मोठा निर्णय

रुपेश नामदास

पुण्यातील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांचं आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन बैठकीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. Latest Marathi News

त्यामुळे आता दगडूशेठ हलवाई मंदिराला 'क' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे. तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचंही आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

देशातील अनेक पर्यटक पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येतात, तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यातील गणेशभक्तांसाठी पुण्यातील दगडूशेठ मंदिर श्रद्धास्थान आहे. राज्य सरकार कडून गड, किल्ले, मंदिरांचं संवर्धन करण्यासाठी तब्बल ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पुण्यातील सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर आणि वाफगावच्या होळकर वाडा वास्तूंचं राज्य सरकारकडून संवर्धन करण्यात येणार आहे.

या निर्णयाची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटंल आहे की, "पुणे जिल्हा नियोजन समितीची आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता दिली. Marathi Tajya Batmya

तसेच मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी; यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 10 ठिकाणचा गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांचा विकास, पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावांसाठी सुविधा, पोलिस दलाचे अद्ययावतीकरण करणे, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून

या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्या सह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात; पुणे पोलिसांनी काढली धिंड

...आणि नीरजसाठी लिहिलेली चिठ्ठी बाबांनी वाचली; मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधीचा मजेदार किस्सा

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर 'हे' स्वस्त उपाय केल्यास होईल धनप्राप्ती अन् माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Jalgaon News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रमक हल्ला

Natural sleep remedies : तुमच्या डोक्यात रात्री खूप विचार येतात का? ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी 'हा' घरगुती उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT