ट्रॅक्टर खरेदी फसवणुकीतील संशयितास अटक
कास, ता. २० : ट्रॅक्टरच्या खरेदीचा व्यवहार करून त्याबाबत मालकाला नोटरी करून संबंधित ट्रॅक्टरचे हप्ते न भरता ते ट्रॅक्टर परस्पर तिसऱ्यालाच विकल्याबद्दल मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टरसह अन्य एक फसवणुकीतीलच ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
मेढा पोलिसांच्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी अजित मोहन दुदुस्कर (वय ४० वर्षे, रा. मोरेवाडी पो. दरे खुर्द, ता. जावळी) यांच्या नावावर असलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच ११ डीएन २३३७) अजय संतोष चव्हाण (रा. सरताळे, ता. जावळी) याने फिर्यादीकडून ट्रॅक्टरचे हप्ते भरण्याची नोटरी करून देऊन तो तिसऱ्यालाच देऊन फसवणूक केली होती. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील साक्षीदार दत्तात्रय रामचंद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावळी) यांचा कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच ११ डीए ५२०६) फसवणूक करून घेऊन गेल्याबाबतची फिर्यादही दाखल झाली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून फसवणूक झालेले व्यक्तींचे ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई केली. याप्रकरणी अजय संतोष चव्हाण (वय २३, रा. सरताळे) यास अटक करण्यात आली असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांनी त्यास उद्यापर्यंत (शनिवार) पोलिस कोठडी सुनावली. संबंधिताने हे ट्रॅक्टर कांतिलाल अर्जुन होन (रा. साई सिटी श्रीराम पार्क सी/१९ कोपरगाव जि. अहिल्यानगर) यांना दिले होते. ते दोन्ही ताब्यात घेण्यात आले असून, त्याची एकूण किंमत नऊ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. मेढा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील, पोलिस हवालदार प्रमोद निकम, कॉन्स्टेबल सनी काळे, सूरज वाघमळे, सुनील वाघमळे, ओंकार दीक्षित, ओंकार चव्हाण, अजय गुरव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
फोटो :..........04608
मेढा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितासह जप्त केलेले ट्रॅक्टर.
.......................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.