loan sakal
पुणे

Pune News : पारंपरिक बलुतेदार कारागिरांना मिळणार व्यवसायासाठी ३ लाखांचे कर्ज

पुणे जिल्ह्यातील विविध १८ प्रकारच्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील विविध १८ प्रकारच्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज दर साल दर शेकडा (द. सा. द. से.) केवळ पाच टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्र सरकारने पारंपारिक व्यावसायांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत हे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अठरा पारंपरिक बलुतेदार कारागिरांना सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचे संकेतस्थळ, सामान्य सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

- आधार कार्ड

- पॅन कार्ड

- जन्म तारखेचा पुरावा किंवा हस्तांतरण प्रमाणपत्र

- जातीचे प्रमाणपत्र

- शिधापत्रिका

- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

- बँकेचे पासबुक

- आधारकार्ड संलग्न असलेला मोबाईल नंबर

योजनेची वैशिष्ट्ये

- ग्रामीण व शहरी पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या व्यावसखयात स्थैर्य निर्माण करणे

- त्यांना व्यवसायीक प्रशिक्षण देवून आर्थिक मदत करणे.

- ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी व्यासपीठ तयार करणे.

प्रशिक्षण व प्रमाणपत्र देणार

या योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या कारागिरांना ५ दिवसीय मुलभूत प्रशिक्षण व १५ दिवसीय कौशल्यपुर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रत्येकी प्रति दिन ५०० रूपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ मिळू शकणारे पारंपरिक कारागीर

सुतार, लोहार, सोनार (दागिने कारागीर), कुंभार, न्हावी, माळी (फुल कारागीर), धोबी, मुर्तीकार, टोपल्या, झाडू, बांबुच्या वस्तू बनविणारे, शिंपी, गवंडी, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनविणारे, कुलूप बनविणारे व विणकर कामगार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT