पुणे

‘ट्रॅफिक बडी’चे आहे लक्ष; व्हॉट्सॲपवरून थेट तक्रार

CD

पिंपरी, ता. ७ : वाहतूक कोंडी, नो-पार्किंगमधील वाहने, रस्त्यावर उभी केलेली अवजड वाहने, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे अशा वाहतूक नियमभंगाच्या घटनांबाबत नागरिकांना आता प्रत्यक्ष पोलिस ठाणे अथवा वाहतूक विभागात न जाता व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातूनही कळविता येत आहेत. ‘ट्रॅफिक बडी’ या डिजिटल उपक्रमामुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमधील संवाद अधिक वेगवान झाला असून तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यास मदत होत आहे. जुलै महिन्यात ‘ट्रॅफिक बडी’च्या माध्यमातून २५७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये सर्वाधिक वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबतच्या ९४५ तर त्या खालोखाल बेकायदा पार्किंगबाबतच्या ७८८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रकार नागरिकांना पुराव्यासह मांडता यावेत, म्हणून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ‘हॉट्सॲप चॅट बॉट’ सुरु केला आहे. १८ जून २०२५ पासून हा उपक्रम सुरु झाला आहे. ८७८८६४९८८५ हा क्रमांक आपल्या मोबाइलमध्ये जतन केल्यास या ‘ट्रॅफिक बडी व्हाट्सअप चॅट बॉट’ नंबरद्वारे, नागरिकांना तक्रार करता येते. एखाद्या नागरिकाने संदेश पाठविल्यानंतर त्याला भाषा निवडण्याचा पर्याय येतो. त्यानंतर नाव विचारले जाते. मग वाहतूक नियमाचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, अनियमितता, खराब रस्ता, अवैध पार्किंग, वाहतूक सिग्नल समस्या, सूचना शेअर करा, जड-अवजड वाहनांद्वारे वाहतुकीचे उल्लंघन, असे मुद्दे दिले जातात.
जी समस्या अथवा तक्रार असल्यास त्याचा क्रमांक टाकल्यानंतर एक लिंक येते. त्यावर क्लिक करून फोटो अपलोड करता येतो. ही माहिती वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात पोहोचते. संबंधित वाहतूक विभागाला तक्रारीबाबत कळविले जाते. त्यानंतर पुढील कार्यवाही होते. यामुळे पोलिस व कॅमेऱ्यांच्या अपरोक्ष घडणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचतात.

दृष्टिक्षेपात
एक ते ३१ जुलैदरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी

प्रकार कारवाई

-वाहतूक नियमांचे उल्लंघन ९४५
-वाहतूक कोंडी ३५५
-अनियमितता २२
-खराब रस्ते ७७
-बेकायदा पार्किंग ७८८
-ट्रॅफिक सिग्नल ५६
-जड-अवजड वाहनांद्वारे नियम उल्लंघन २३
-इतर सूचना ५८
-फेटाळलेल्या तक्रारी २५१
===========
एकूण २५७५


या उपक्रमामुळे वाहतुकीसंदर्भातील समस्या आमच्यापर्यंत पोहचत आहेत. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीची तात्काळ दाखल घेऊन कार्यवाही केली जात आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यासह अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.
- विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT