Traffic congestion Duttnagar Chowk
Traffic congestion Duttnagar Chowk sakal
पुणे

बेशिस्त चालक व अवजड वाहनांमुळे दत्तनगर चौकात वाहतूक कोंडी

किशोर गरड

आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव परिसराचा मुख्य रस्ता असणाऱ्या दत्तनगर चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असून,वाहतूक कोंडी नित्याची होऊन बसली आहे. आंबेगाव परिसर झपाट्याने विकसित होत असून या परिसराला कामगारवर्ग व नोकरदारवर्ग रहिवासासाठी प्राधान्य देताना दिसत असतानाच, आंबेगावचा मुख्य मार्ग असलेला दत्तनगर चौक मात्र रोजच वाहतूक कोंडीत अडकतो असल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते आहे. दरम्यान, चौकात असणारे पोलीस कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत तर चौकात ड्युटीवर असणारे कर्मचारी चौकसोडून इतरत्र पावत्या फाडत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

भारती विद्यापीठ कडून आंबेगाव, नऱ्हे, जांभुळवाडी कोळेवाडी ला जाणारा एकमेव रस्ता असल्याने शाळा, कॉलेज व कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नोकरदार वर्गालाही दत्तनगर चौकातूनच जावे लागते.काही बेशिस्त नागरिकांकडून विरुद्ध दिशेने वाहने चालविली जातात याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करताना दिसत आहेत. शिवाय परिसरात मोठं मोठे व्यावसायिक माल वाहतुकीसाठी अवजड वाहनांचा वापर करत आहेत. मोठ्या मालवहू ट्रक,सिमेंट मिक्सर, डबर वाहतूक करणारे हायवा डंपर,पाणी टँकर आदी अवजड वाहतूकीसाठी दत्तनगर जांभूळवाडी मार्गांवर बंदी असूनही याचे सर्रासपणे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उल्लंघण होताना दिसते आहे. तर पोलीस कर्मचारी भर रस्त्यात मोटारसायकल चालकांना नियम शिकवून पावत्या फाडत असल्याचे दिसत आहे.

महापालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवाई नंतर एक महिना उलटूनही तेथील रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. नव्यानेचं झालेल्या दत्तनगर शनीनगर चौक दरम्यान १८ मिटर रुंदीकरण झालेल्या रस्त्यावरील ड्रेनेज व पावसाळी लाइनची झाकणेही भर चौकात खचलेली आहेत. त्यामुळे चौकात वाहनांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे आपसूकच वाहतूक कोंडी होते.तर, वाहतूक पोलीस कर्मचारी कोंडी झाल्यावर चौकात येत असल्याचीही तक्रार नागरिक करत आहेत.

वाहतूक कोंडीवर करता येणारे उपाय

१)दत्तनगर चौकातील चारही बाजूला असणारी रिक्षा थांबे किमान १०० मी अंतरावर स्थलांतरित करणे.

२) चौक परिसरात पी १,पी २ अशा स्वरूपाचे वाहन थांबे करता येतील.

३) भारती विद्यापीठ कडून येणाऱ्या राजमाता भुयारी मार्गातील वाहतूक एकेरी करता येईल.

४) कात्रज ते नऱ्हे, जांभुळवाडी दरम्यान असणारी अवैध रिक्षा वाहतूक कारवाई करता येईल.

५) डीपी रस्ते शक्यहोईल तितके लवकरात लवकर पूर्ण करावेत.

प्रतिक्रिया

स्थानिक लोकप्रतिनिधींकडुन परिसरात मंजूर असलेले डीपी रस्ते करता आले नसल्याने चौक वाहतूक कोंडीत सापडला आहे. डीपी रस्ते झाले असते तर चौकातील वाहतुकोंडीचा प्रश्न मार्गी लागला असता.

संदीप बेलदरे, भाजपा पदाधिकारी.

आंबेगाव परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिवाय अरुंद रस्ते व बेशिस्त चालकांमुळेही बऱ्याच वेळा वाहतूककोंडी होत असते. वाहतूक पोलीस सदरील ठिकाणी कारवाई करत आहेत.

अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग भारती विद्यापीठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT