mumbai pune express way  sakal media
पुणे

मुंबई पुणे महामार्गावर 'ट्रॅफिक जाम', सलग सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी

ओमकार वाबळे

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी शहरांबाहेर जाण्याचे प्लॅन्स केल्याचं दिसतंय. यामुळे खंडाळा घाटात लांबचं लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. (Mumbai Pune Express Way Traffic Jam)

बोर घाटात देखील ट्रॅफिक जाम झालं आहे. तासाभरापासून ही रांग लागल्याची माहिती मिळत आहे. बोर घाटात पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली आहे. खालापूर टोल नाक्यावरही रांगा लागल्या आहेत. तर, लोणावळ्यातही मुंबईकडे येणाऱ्या काही भागात वाहनांची गर्दी झाली आहे.

मुंबईवरुन पुण्याकडे येताना असणाऱ्या मोठ्या चढामुळे जड वाहनांची वाहतूक मंदावते. त्यामुळे याठिकाणी वाहनांच्या रांगा लागत जातात. अनेकदा या भागात वाहतूक कोंडी झालेली असते, त्यामुळे एक्सप्रेस वे असूनंही वाहनांची गती मात्र १० ते २० किमी प्रती तास असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT