पिंपरी, ता. ८ : रस्त्यांच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक व सुरक्षाविषयक समस्यांवर उपाययोजना सुचवीत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि रोड सेफ्टी’संदर्भातील संशोधनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नागरिकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.
पीएमआरडीएच्या कार्यालयात नुकतीच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी ‘सनीज वर्ल्ड ते सिम्बायोसिस, लवळे’ या रस्त्याच्या कामासंदर्भातील विविध अडचणी व समस्यांकडे विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले. मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, कार्यकारी अभियंता वसंत नाईक आणि उपअभियंता अमित तिडके यांनी विद्यार्थ्यांकडून रस्त्याशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. संबंधित ठिकाणची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सायली सांडभोर, प्रा. हुमेरा खान, डॉ. संजीव कदम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पीएमआरडीएच्या विविध कामकाजाची माहितीही घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.