पुणे

वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याचा मुद्दा विधानसभेत; तालिका सभापतींचे कारवाईचे निर्देश

CD

वाहतूक पोलिसांनी पैसे घेतल्याचा मुद्दा विधानसभेत

पंढरपुरात ट्रक चालकाला अडविल्याची घटना; तालिका सभापतींचे कारवाईचे निर्देश

पंढरपूर, ता. ४ ः पंढरपूर वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाकडून एक हजार रुपये घेतल्याच्या गंभीर आरोपाचा मुद्दा आज मोहोळचे आमदार राजू खरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर तालिका सभापती समाधान आवताडे यांनी संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी (ता. ३) पंढरपूर शहरातील नो एन्ट्रीतून अवजड कंटेनर सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक हजार रुपये घेतल्याचा आरोप संबंधित चालकाने केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी भर चौकात मारहाण केली होती. याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होता. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी मोहोळचे आमदार राजू खरे देखील दाखल झाले होते. यावेळी आमदार खरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता, पोलिसांनी नो एन्ट्रीतून सोडण्यासाठी एक हजार रोख घेतले आणि दोन हजार रुपयांचे ई चलनद्वारे दंड ही केला होता. भर रस्त्यात हा सगळा गोंधळ सुरू होता. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालक खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बुधवारी (ता. ४) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार राजू खरे यांनी पोलिसांनी ट्रक चालकाकडून पैसे घेऊन मारहाण केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. एक हजार रुपये रोख घेतल्यानंतरही दोन हजार रुपयांचा दंड पोलिसांनी केल्याचा आरोप चालकाने केला आहे. यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ वाघमोडे आणि मारहाण करणाऱ्या इतर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रश्नावर तालिका सभापती समाधान आवताडे यांनी चौकशी करून त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

पंढरपूर, ता. ४ ः वनविभाग तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या मुरुम माफियांना यापुढे सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिले.
अलीकडेच खरातवाडी (ता. पंढरपूर) येथे मुरुम माफियांनी वनपरिक्षेत्र अधिकारी शितल चाटे यांच्या अंगावर टिप्पर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर आज माढ्याचे आमदार अभिजित पाटील व पंढरपूचे आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार अभिजित पाटील यांनी खरातवाडी येथील संबंधीत शेतकऱ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचे सांगितले तर आमदार समाधान आवताडे यांनी मात्र महिला अधिकारी सुरक्षित नाहीत. मुरुम माफियांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, यापुढे महसूल किंवा वन अधिकाऱ्यांनी कारवाईला जात असताना पोलिसांना सोबत घेऊन जावे म्हणजे हल्ले होणार नाहीत असा सूचना दिल्या. जे कोणी माफिया वन अधिकारी किंवा महसूलच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करतील अशा, अशा माफियांना सोडणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT