Pune traffic sakal
पुणे

Pune Traffic : वाघोलीत पुणे नगर महामार्गावरील सांडपाण्याने वाहतुकीस अडथळा ; केसनंद फाटा परिसरात वाहतूक कोंडी

एकीकडे वाघोलीत वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पुणे व लोणीकंद वाहतूक विभाग कंबर कसत असताना दुसरीकडे पुणे महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : एकीकडे वाघोलीत वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पुणे व लोणीकंद वाहतूक विभाग कंबर कसत असताना दुसरीकडे पुणे महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी होत आहे. केसनंद फाटा ते स्टार बजार मॉल पर्यंत पुणे नगर महामार्गावर असणारे सांडपाणी या कोंडीचे कारण आहे.      

महामार्गाच्या पावसाळी वाहिनीला काही सोसायट्यांनी सांडपाणी वाहिनी जोडल्याने हे पाणी ओव्हरफ्लो होवून महामार्गावर येत आहे. केसनंद फाटा ते स्टार बाजार मॉल पर्यंत हे पाणी साचलेले आहे. या पाण्याने अर्धा रस्ता व्यापला आहे. यामुळे वाहतुकीची एकच लेन येथून चालते. या भागात रस्त्याची रुंदी ही कमी आहे. खाजगी बसेस, एस टी बसेस, पी एम टी व अन्य वाहने रस्त्यावरच प्रवासी घेण्यासाठी थांबतात.

तर प्रवासीही पाणी असल्याने अर्ध्या रस्त्यावर येऊन थांबतात. यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होते. हे पाणी अनेक दिवसापासून महामार्गावर वाहत आहे. मात्र महापालिका, पी एम आर डी ए व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकाकडे बोट दाखवतात.

कोणीही गांभीर्याने घेत नाही. या पाण्याच्या दुर्गंधीने ही नागरिक त्रस्त आहेत. केसनंद फाटा भागात या वाहिनीला पुढे वाहिनी जोडण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. मात्र हे काम होईपर्यंत पाणी तसेच ठेवणार आहे का ? असा सवाल नागरिक करीत आहे. या पाण्याची व्यवस्था पूर्वीच करायला हवी होती.

मात्र महापालिका अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा याला कारणीभूत आहे. सांडपाणी वाहिनीचे काम होई पर्यंत या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत. वाहतूक विभागाने केसनंद फाटा परीसरातील कोंडी कितीही हटविण्याचा प्रयत्न केला तरी या समस्येमुळे ही कोंडी हटणार नाही हे मात्र नक्की. याबाबत उपायुक्त किशोरी शिंदे यांना संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT