पुणे

हिंजवडीत विसर्जन मिरवणुकीमुळे बुधवारी वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 11) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. हिंजवडी परिसरात दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार बुधवारी मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही बदल केले आहेत. 

बंद असलेले मार्ग 
- मेझा नाईन हॉटेल चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारे सर्व मार्ग 

- कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा मार्ग 

- इंडियन ऑइल चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा मार्ग 

पर्यायी मार्ग 
- फेज दोन व तीनकडून येणारी वाहने टी-जंक्‍शन चौकात डावीकडे वळून लक्ष्मी चौक विनोदेवस्तीमार्गे इच्छितस्थळी 

- फेज दोन, तीनकडून येणारी व फेज एककडे जाणारी वाहने जॉमेट्रिक सर्कल चौकातून यू. टर्न घेऊन बॅंक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी 

- फेज एककडून येणारी वाहने मेझा नाईन चौकातून डावीकडे वळून लक्ष्मी चौक, विनोदे वस्ती या मार्गाने पुढे इच्छितस्थळी 

- इंडियन ऑइल चौकातून माणगाव फेज एककडे जाणारी वाहने इंडियन ऑइल चौकातून उजवीकडे वळून कस्तुरी चौक, विनोदे वस्ती, लक्ष्मी चौक, टी जंक्‍शन येथून डावीकडे वळून जॉमेट्रिक सर्कलमधून यू. टर्न घेऊन बॅंक ऑफ महाराष्ट्र येथून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT